Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला (Hunger Strike) बसलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढत असतानाच राज्य सरकारही ॲक्शन मोडमध्ये आले आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज ११ वा दिवस असून सोमवारी मध्यरात्री त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजाकडून देखील विविध आंदोलने केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या वर्षा निवासस्थानी मध्यरात्री उच्चस्तरीय बैठक पार पडली.

या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), उदय सामंत (Uday Samant), राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), अतुल सावे (Atul Save), रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) उपस्थित होते. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारची पुढील भूमिका काय असावी, तसेच मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्यांवर कोणता कायदेशीर आणि प्रशासकीय मार्ग काढता येईल, यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे.

Maratha Reservation: जरांगेंच्या कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवर चर्चा

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. मराठा समाजाचा ओबीसी कोट्यात समावेश करण्याचा कोणताही निर्णय घेतल्यास ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का बसू नये, यावर सरकारचा विशेष भर असल्याचे समजते. त्यामुळे एकीकडे मराठा समाजाच्या मागण्या आणि दुसरीकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या यांच्यात समतोल साधण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे.

Maratha Reservation: आरक्षणाचा निर्णय न्यायालयात टिकणारा असावा

मराठा आरक्षणाचा प्रश्न यापूर्वीही न्यायालयीन पातळीवर चर्चेत राहिला आहे. त्यामुळे सरकारकडून कोणताही निर्णय घेताना तो संविधानिक आणि कायदेशीर चौकटीत राहावा, तसेच भविष्यात न्यायालयात टिकणारा असावा, यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर उपलब्ध असलेल्या विविध कायदेशीर पर्यायांचा विचार करण्यात आला.

Maratha Reservation: मराठा-ओबीसी संघर्ष टाळण्याचे सरकारसमोर आव्हान

मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. दुसरीकडे ओबीसी संघटनांकडूनही त्यांच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये, अशी भूमिका घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही समाजांमध्ये सामाजिक तणाव निर्माण होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सरकारकडून समन्वय साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता सरकारच्या पुढील भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Manoj Jarange Patil health: मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट, 7 किलो वजन घटलं, शुगर लेव्हल ड्रॉप; मध्यरात्री उदय सामंतांचा फोन