Maratha Reservation : वेळ वाया घालवू नका...; जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्याशी बोलताना जरांगेंच्या डोळ्यात अश्रू, तब्येत बिघडली

1 month ago 6
ARTICLE AD

Manoj Jarange Hunger Strike Update : मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस असून जालन्यात मोठ्या राजकीय व प्रशासकीय घडामोडी घडत आहेत. सलग चार दिवसांपासून उपोषणाला बसल्यामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे, तरीही ते आंदोलनावर ठाम आहेत. अशातच शासकीय अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ जरांगेंशी चर्चा करण्यासाठी अंतरवली सराटीत दाखल झाले. यावेळी जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्याशी संवाद साधताना मनोज जरांगे अत्यंत भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आल्याचं दिसून आलं.

जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, "कलेक्टर मॅडम, तुम्ही आलात पण या गोष्टी तुमच्या स्तरावरील नाहीत. या सर्व मागण्या राज्यस्तरीय आहेत. सरकार तुम्हाला उगाच पुढे करत आहे. या मागण्यांशी तुमचा थेट संबंध नाही, त्यामुळे तुमची एनर्जी वाया घालवू नका. मी तुमचा सन्मान करतो, पण मी तुमचे ऐकणार नाही. यानंतर तुम्ही येऊ नका."

Manoj Jarange Statement : 'आरक्षणापासून एक इंचही मागे हटणार नाही'

आपली व्यथा मांडताना जरांगे पुढे म्हणाले, "समाजाच्या लेकरांचे वाटोळे होत आहे. एका दिवसात शिबिर लागू शकते, मग यांना चार महिने कशाला हवेत? सातारा आणि कोल्हापूर संस्थानांचे गॅझेट तात्काळ लागू करून सकाळीच जीआर काढा. आंतरवली सराटीमधील गुन्हे मागे घ्यायचे नसतील तर समोरच्यांवर गुन्हे दाखल करा. मी या उपोषणापासून एक इंचही मागे सरकू शकत नाही. सरकारने आता वेळकाढूपणा थांबवून मागण्या मान्य कराव्यात आणि त्यांची अंमलबजावणी करावी."

Ashima Mittal Collector Statement : 'संवाद थांबणार नाही, उपोषण सोडावं'

जालन्याच्या जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी जरांगे यांच्याशी प्राथमिक चर्चा केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, "प्रशासन म्हणून आमच्या काही मर्यादा आहेत. 58 लाख नोंदी असलेला डेटा आम्ही येथे आणला आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने त्यांनी कृपया उपोषण सोडावे आणि किमान पाणी तरी घ्यावे, अशी मी विनंती करते. संवैधानिक मर्यादा पाळून जे करणे शक्य आहे ते सर्व करण्यास शासन कटिबद्ध आहे आणि आमचा संवाद पुढेही सुरूच राहील."

Ministers Delegation Antarwali Sarati : मंत्र्यांचे शिष्टमंडळ आंतरवली सराटीला भेट देणार

दरम्यान, मराठा आंदोलकांनी मुंबईच्या दिशेने कूच करण्यास सुरुवात केली आहे. अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्यानंतर आता शासनाचे मंत्र्यांचे शिष्टमंडळ आंतरवलीत येण्याची शक्यता आहे. या शिष्टमंडळात उद्योगमंत्री उदय सामंत, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मकरंद आबा पाटील यांचा समावेश आहे. मनोज जरांगे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास मंत्र्यांचे हे पथक आंतरवली सराटीत जाऊन जरांगे यांचे उपोषण सोडवणार असल्याची माहिती समोर येत आहे.

ही बातमी वाचा:

मंत्री जयकुमार गोरेंचा ताफा अडवला, मराठा बांधवांची थेट गाडीखाली उडी; पालकमंत्र्यांची SP अंजना कृष्णांशी चर्चा

Read Entire Article