MPSC Exam : एमपीएससीचा मोठा निर्णय! गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, 'या' दिवशी होणार नवी परीक्षा

1 month ago 9
ARTICLE AD

MPSC Group C Exam Postponed : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी प्रसिद्ध केली आहे. आयोगाने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित केली जाणार होती. मात्र, आता नव्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा 3 जानेवारी 2027 रोजी राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांवर पार पडेल.

MPSC Exam New Dates : परीक्षेची जुनी व नवी तारीख

जाहिरात क्रमांक: 017/2026 (दिनांक 25 जून 2026)

जुनी परीक्षेची तारीख: 25 ऑक्टोबर 2026 (प्रचलित Offline OMR पद्धतीने)

नवी सुधारित तारीख: 3 जानेवारी 2027

जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.https://t.co/YjNi18wrfJ pic.twitter.com/rzXYSg7k8K
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) September 9, 2026

MPSC Group C Combined Prelims Exam Postponed : परीक्षा पुढे ढकलण्यामागची कारणे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे की, परीक्षेचे नियोजन शांततापूर्ण, सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने व्हावे यासाठी विविध प्रशासकीय आणि स्थानिक बाबींचा आढावा घेण्यात आला. परीक्षा पुढे ढकलण्यासाठी खालील मुख्य कारणे विचारात घेण्यात आली आहेत:

प्रशासकीय आणि जिल्हा अहवाल: राज्यातील विविध जिल्ह्यांमधील परीक्षा उपकेंद्रांची उपलब्धता आणि जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेले अहवाल.

सणासुदीचा काळ व वाहतूक: सणांचा कालावधी, स्थानिक परिस्थिती, वाहतूक व्यवस्था आणि उमेदवारांना परीक्षा केंद्रांवर सुरक्षित व वेळेत पोहोचण्यासाठी येणाऱ्या अडचणी.

इतर परीक्षा व अधिवेशन: राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2026 चे नियोजन, इतर भरती संस्थांच्या परीक्षांचे वेळापत्रक आणि राज्य शासनाचे हिवाळी अधिवेशन.

MPSC Important Instructions : परीक्षार्थींसाठी महत्त्वाच्या सूचना

प्रवेशपत्र आणि वेळ: परीक्षेचे केंद्र, प्रवेशपत्र (Admit Card), परीक्षेची वेळ आणि इतर आवश्यक सूचना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केल्या जातील.

अधिकृत संकेतस्थळ: सर्व परीक्षार्थींनी कोणत्याही अस्वाभाविक अफवांवर विश्वास न ठेवता आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला (mpsc.gov.in) नियमित भेट द्यावी.

ही बातमी वाचा:

MPSC : परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न

Read Entire Article