MPSC Paper Leak: एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुंबई गुन्हे शाखेकडून आणखी 4 जणांना अटक, आरोपींचा आकडा 11 वर

1 month ago 5
ARTICLE AD

MPSC Paper Leak: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक (Drug Inspector) परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेने (Crime Branch) मोठी कारवाई करत आणखी चार आरोपींना अटक (Arrest) केली आहे. विशेष तपास पथकाने (SIT) कारवाई करत दोन मध्यस्थ आणि दोन उमेदवारांना बेड्या ठोकल्या आहेत. या नव्या अटकेमुळे या घोटाळ्यातील एकूण आरोपींची संख्या आता 11 वर पोहोचली आहे.

MPSC Paper Leak: सांगोला, बुलढाणा आणि नवी मुंबईतून चौघे ताब्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये साजिद संदे याला सांगोला (Sangola) येथून तर विजय किंगर याला बुलढाणा (Buldhana) येथून ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात मध्यस्थाची भूमिका बजावणाऱ्या संदीप खलाटे आणि भैरवनाथ कदम या दोघांना नवी मुंबई (Navi Mumbai) परिसरातून अटक करण्यात आली आहे.

MPSC Paper Leak: याआधी 'या' आरोपींना अटक

या प्रकरणाचा तपास करत असताना याआधी अवर सचिव अभिजीत लेंडवे, गोपनीय कक्षात काम करणारा सहाय्यक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते, सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे, कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांच्यासह मध्यस्थ अमृत पाटील, लोकेश उर्फ गौरव पाटील आणि उमेदवार ऋतुजा पाटील यांना अटक करण्यात आली होती.

MPSC Paper Leak: नेमके काय आहे प्रकरण?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) अन्न व औषध प्रशासनातील (Food and Drug Administration) औषध निरीक्षक, गट-ब संवर्गातील एकूण 154 पदांसाठी 22 मार्च 2026 रोजी महाराष्ट्रातील 6 विविध परीक्षा केंद्रांवर (Exam Centers) परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेदरम्यान शासकीय पदाचा गैरवापर करून, गोपनीयतेचा व निष्पक्षतेचा भंग करत आर्थिक फायद्यासाठी प्रश्नसंच अनधिकृतपणे लीक करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

MPSC Paper Leak: गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल

या संपूर्ण घोटाळ्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 112, 316 (4), 316 (5), 318 (4), 328 (ब), 371 (2), 303 (2), 61 (2), 3 (5) सह 'महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) अधिनियम, 2024' चे कलम 19 (9)(2)(3), 12 (9)(2) आणि 'भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, 1988' मधील कलम 13 (2) व 13 (1) (अ) अन्वये गंभीर गुन्हे दाखल (FIR) करण्यात आले आहेत. या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास गुन्हे शाखा करत आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Video: ‘जल्दी बोल, सुबह पनवेल निकलना है’ म्हणताच प्राध्यापक संतापले; विद्यार्थ्याची स्टेजवरच कॉलर पकडली अन्...; नेमकं काय घडलं?

Read Entire Article