Mumbai Crime News: मुंबईतील आग्रीपाडा (Agripada) परिसरातील कालापानी चौकी (Kalapani Chowki) परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून एका 19 वर्षीय पतीने आपल्या अवघ्या 19 वर्षांच्या पत्नीचा बळी घेतल्यानंतर स्वतःचेही आयुष्य संपवले आहे. या घटनेमुळे संपूर्ण आग्रीपाडा परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आग्रीपाडा येथे राहणाऱ्या मोहम्मद एहसान शेख (वय 19) आणि त्याची पत्नी जन्नत शेख (वय 19) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून घरगुती कारणांवरून वाद सुरू होते. शुक्रवारी सकाळी 5 च्या सुमारास त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात मोहम्मद एहसान याने स्वयंपाकघरातील धारदार चाकूने पत्नी जन्नतच्या गळ्यावर वार करून तिचा गळा चिरला.

Mumbai Crime News: नायर रुग्णालयात उपचारादरम्यान पतीचा मृत्यू

पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर मोहम्मद एहसान याने त्याच चाकूने स्वतःचाही गळा चिरून घेतला. या घटनेत गंभीर दुखापत झाल्यामुळे जन्नत हिचा जागीच मृत्यू झाला. तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोहम्मदला तातडीने जवळच्या नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र, उपचारादरम्यान त्याचा देखील मृत्यू झालाय.

Mumbai Crime News: आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या दुहेरी घटनेची माहिती मिळताच आग्रीपाडा पोलिसांनी (Agripada Police) घटनास्थळी धाव घेतली. घरगुती वादाचे नेमके कारण काय होते, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Case Registered) करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Nashik Crime News: नाशिकमध्ये आठवीतील विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) बोरीपाडा शासकीय आश्रमशाळेतील आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी काल संध्याकाळी शाळेतून घरी परतल्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेतली आहे. विद्यार्थिनीने नेमके कोणत्या कारणामुळे हे टोकाचे पाऊल उचलले, याचा पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे बोरीपाडा परिसरात शोककळा पसरली असून, विद्यार्थिनीच्या टोकाच्या पावलामागील कारण स्पष्ट होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Shobha Bachhav: 'माझ्या खात्यात 62 हजार रुपये जमा करा, मी दोन तासांत परत करेन', काँग्रेस खासदाराचा मोबाईल हॅक झाला अन्...; नेमकं काय घडलं?