Mumbai Crime News: मुंबईतील मालाड (Malad) परिसरात सायबर भामट्यांनी (Cyber Criminals) 'डिजिटल अरेस्ट'च्या (Digital Arrest) नावाखाली दोन वेगळ्या घटनांमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांना तब्बल 14 दिवस घरातच ओलीस ठेवत एकूण 1 कोटी 63 लाख 80 हजार रुपयांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंबई सायबर पोलिसांनी (Mumbai Cyber Police) गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Mumbai Crime News: पहिली घटना: नाशिक पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने 63.50 लाखांना गंडा

मालाड पश्चिमेकडील चिंचोली बंदर रोड (Chincholi Bunder Road) येथे राहणारे 76 वर्षीय सायमन अलेक्झांडर कोरिया यांना 1 सप्टेंबर 2026 रोजी एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल (WhatsApp Video Call) आला. पोलिसांच्या वेशातील एका व्यक्तीने स्वतःचे नाव नाशिक पोलीस अधिकारी 'संजय पिसे' असल्याचे सांगितले. कोरिया यांच्या ओळखपत्राचा गैरवापर करून एका बँक खात्यातून (Bank Account) 2 कोटी रुपयांचे बेकायदेशीर व्यवहार झाल्याची भीती त्यांना दाखवण्यात आली. बँक खात्याच्या पडताळणीच्या नावाखाली भामट्यांनी त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने 63 लाख 60 हजार 47 रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांत ट्रान्सफर करून घेतले.

Mumbai Crime News: दुसरी घटना: दहशतवादी संघटनेला निधी दिल्याचा बनाव रचून 89.80 लाखांना गंडवले

दुसऱ्या घटनेत मालाड येथील धीरज पूजा सोसायटीत राहणारे 72 वर्षीय संतानो अलेक्झांडर अँड्रेडे यांना 28 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2026 या कालावधीत सायबर ठगांनी घरातच डिजिटल अरेस्ट ठेवून भयभीत केले. भामट्यांनी नाशिक पोलीस मुख्यालयातील आयपीएस अधिकारी आणि 'संदीप राव' नावाचा पोलीस कर्मचारी बोलत असल्याचे भासवले. अँड्रेडे यांच्या डेबिट कार्डचा वापर एका दहशतवादी संघटनेला निधी पुरवण्यासाठी झाल्याचा खोटा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात 7 वर्षांचा तुरुंगवास होण्याची भीती दाखवून भामट्यांनी अँड्रेडे यांच्या बँकेतील सर्व मुदत ठेवी मोडून घेण्यास भाग पाडले आणि एकूण 89 लाख 80 हजार रुपये आपल्या खात्यांवर वळवून घेतले.

Mumbai Crime News: सायबर पोलिसांकडून तपास सुरू

दोन्ही प्रकरणांत मिळून एकूण 1 कोटी 63 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पीडितांनी पोलिसांत धाव घेतली. मुंबई सायबर पोलिसांनी या दोन्ही गुन्ह्यांची गंभीर दखल घेतली असून, ज्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर झाले आहेत त्यांची आणि कॉल डिटेल्सची तपासणी करून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Mumbai Crime News: भाच्याला भेटायला आला, मित्रांसोबत बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावर झोपला; पहाटे लिफ्टच्या डक्टमध्ये पडून 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, मुंबईतील धक्कादायक घटना