Mumbai Crime News: 'ये इलाका हमारा है...'; अंधेरीत दहशत माजवणाऱ्या 'बडा कन्ना' अन् 'सत्या' टोळीवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; मकोकाअंतर्गत मोठी कारवाई

1 month ago 6
ARTICLE AD

Mumbai Crime News: अंधेरी पूर्व (Andheri East) परिसरात माथाडी कामगार युनियनच्या (Mathadi Workers Union) नावाखाली दहशत निर्माण करून कंपन्या, उद्योग आणि बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी उकळल्याचा आरोप असलेल्या सत्या आणि बडा कन्ना टोळीविरोधात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या (MIDC Police Station) हद्दीत या संघटित टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (MCOCA) कारवाई करण्यात आली आहे.

कन्नन चिन्नादुराई वन्नियार ऊर्फ बडा कन्ना आणि सत्यम गुरखेल ऊर्फ सत्या हे या टोळीचे प्रमुख असल्याचे तपासात समोर आले आहे. अंधेरी आणि उपनगरातील उद्योग, कंपन्या, व्यापारी आणि बांधकाम व्यावसायिकांमध्ये दहशत निर्माण करून वर्चस्व प्रस्थापित करण्याचा टोळीचा प्रयत्न असल्याचा आरोप आहे.

Mumbai Crime News: ‘ये इलाका हमारा है... 20 हजार हफ्ता देना पड़ेगा!’

अंधेरी परिसरात सत्या आणि बडा कन्ना टोळीने, ‘ये इलाका हमारा है... यहाँ काम करना है, तो हर महीने 20 हजार रुपये हफ्ता देना पड़ेगा!’ अशी धमकी देत खंडणीची मागणी केल्याचे समोर आले आहे. माथाडी कामगार युनियनच्या नावाखाली काम न करता ‘वाराई’ किंवा ‘प्रोटेक्शन मनी’च्या नावाने जबरदस्तीने पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप आहे.

Mumbai Crime News: भरदिवसा लाठी-काठी आणि दांडक्यांनी मारहाण

काही दिवसांपूर्वी अंधेरी पूर्वेतील एमआयडीसी परिसरातील कोंडीविटा रोडवर माथाडी कामगारांच्या एका गटाने दुसऱ्या गटातील व्यक्तींवर भरदिवसा हल्ला केल्याची घटना घडली होती. लाठी-काठी आणि लाकडी दांडक्यांनी तुफान मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणात एका व्यक्तीला खंडणीसाठी लाकडी दांड्याने डोक्यात आणि पायावर मारहाण करून गंभीर दुखापत केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी 17 ऑगस्ट 2026 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Mumbai Crime News: कंपन्यांची वाहने अडवून धमकावल्याचा आरोप

तपासादरम्यान आरोपींनी माथाडी कामगार टोळीच्या नावाखाली बेकायदेशीर कृत्यांसाठी एक संघटित टोळी स्थापन केल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. टोळीवर कंपन्यांची वाहने अडवणे, तलवार आणि चाकूचा धाक दाखवणे, मारहाण करणे तसेच व्यापारी आणि व्यावसायिकांकडून खंडणी उकळण्याचे गंभीर आरोप आहेत. अंधेरी आणि उपनगरात या टोळीने कंपन्या आणि बांधकाम व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप असून, टोळीतील आरोपींविरोधात यापूर्वीही हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि गंभीर दुखापतीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.

Mumbai Crime News: 7 आरोपी अटकेत, 4 जणांचा शोध सुरू

या प्रकरणात आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली असून 4 आरोपींचा शोध सुरू आहे. सत्या आणि बडा कन्ना यांच्यासह टोळीतील मुख्य सदस्यांविरोधात MCOCA अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सक्षम अधिकाऱ्यांची पूर्वमंजुरी मिळाल्यानंतर या गुन्ह्यात MCOCA च्या कलम 3(1)(ii), 3(2) आणि 3(4) अंतर्गत कलमांची वाढ करण्यात आली आहे. संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून व्यावसायिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळीला एमआयडीसी पोलिसांनी मोठा दणका दिला आहे.

Mumbai Crime News: अंधेरीत टोळीयुद्धामुळे नागरिकांमध्ये भीती

अंधेरी परिसरात सुरू असलेल्या टोळीयुद्धामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कंपन्या आणि बांधकाम व्यावसायिकांना धमकावून खंडणीची मागणी करणाऱ्या या टोळीविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत होती. दरम्यान, या टोळीचे काही राजकीय नेत्यांशी संबंध असल्यामुळे टोळीतील सदस्यांमध्ये पोलिसांची भीती संपली असल्याचा आरोप अंधेरीतील काही नागरिकांकडून करण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर या टोळीला राजकीय संरक्षण मिळत होते का, यासह त्यांच्या पाठीशी असलेल्या व्यक्ती आणि नेटवर्कची चौकशी करण्याच्या दृष्टीनेही पोलीस तपास करत असल्याची माहिती समोर येत आहे. अंधेरी आणि मुंबई उपनगरात दहशत निर्माण करून खंडणी उकळणाऱ्या संघटित गुन्हेगारी टोळीविरोधातील ही MCOCA कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, या प्रकरणात तपास पुढे सरकल्यानंतर आणखी कोणाची नावे समोर येतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Wrestler Ashwini Mohite Paul Dharashiv News: महाराष्ट्राच्या वाघिणी'चा दुर्दैवी अंत; महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी, धाराशिवमधील थरकाप उडवणारी घटना

Read Entire Article