Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन

1 month ago 10
ARTICLE AD
<p>Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन</p> <p>मुंबईच्या पवई आयआयटीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नामांकित पवई आयआयटी मुंबईमध्ये एका विद्यार्थ्याने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्याने शुक्रवारी सांयकाळच्या सुमारास टोकाचा पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेनंतर आता विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांनी कॉलेज कॅम्पस परिसरात आंदोलनाचा नारा दिलाय. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स दाखल करण्यात आला असून मुंबई पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. मुंबई पोलीस सध्या विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या सभोवतालच्या परिस्थितीचा तपास करत आहेत. साहिल वाकोडेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आल्याची माहिती आहे. तर तपासाचा भाग म्हणून पोलीस या घटनेला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीचीही तपासणी करत आहेत.</p>
Read Entire Article