Nagpur Aroli Pattern: चारा टंचाईवर मात, सामूहिक शेतीतून आर्थिक सुबत्तेकडे वाटचाल; दुष्काळी परिस्थितीत 45 शेतकऱ्यांची कमाल, नागपूर जिल्ह्यातील अरोली पॅटर्न नेमकं काय?

4 weeks ago 2
ARTICLE AD

Nagpur Aroli Pattern Fodder Shortage: राज्यातील मोठ्या भागात दुष्काळ (Nagpur Drought) सदृश्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काही महिन्यात भीषण चारा टंचाई (Fodder Shortage) होण्याची शक्यता आहे. वर्षानुवर्षे पोसलेले जनावरे या संकटात कशी जगवायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. अशा स्थितीत नागपूर (Nagpur News) जिल्ह्यातील 'अरोली' गावातील 45 शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीच्या (Aroli Fodder Group Farming) माध्यमातून फक्त चारा उत्पादना संदर्भात स्वयंपूर्णताच मिळवली नाही, तर ते वर्षाला दीड ते दोन कोटी रुपयांचा चारा विदर्भातील वेगवेगळ्या शेकडो डेअरी फार्म आणि हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांना पुरवठा ही करत आहे. दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी चारा कसा उपलब्ध होणार? असा राज्यातील लाखो शेतकऱ्यांसमोरील प्रश्न असताना नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातील 45 शेतकऱ्यांचा चारा टंचाईच्या संकटावर मात करत आर्थिक सुबत्तेचा मार्ग दाखवणारं स्तुत्य उदाहरण घालून दिलं आहे. काय आहे हा 'अरोली पॅटर्न हे जाणून घेऊया .(Nagpur Aroli Pattern on Fodder Shortage)

Aroli Fodder Pattern : चारा टंचाईच्या संकटावर मात, काय आहे हा 'अरोली पॅटर्न?

अरोली गावातील 45 शेतकऱ्यांनी 2017 मध्ये 'विश्वास सहकारी शेती विकास संघ' स्थापन करत सामूहिक शेती सुरू केली होती. त्यासाठी सर्वांनी मिळून सुमारे 200 एकर शेतजमिनीवर नेपियर आणि इतर चारा पिकांची शेती सुरू केली होती. सुरुवातीला विक्रीची अडचण आली. मात्र, गेल्या काही वर्षात या शेतकऱ्यांचा चारा उत्पादन आणि विक्रीचा मॉडेल यशस्वी ठरला असून सध्या ते स्वतःच्या गरजेपुरता चारा तर उत्पादित करतच आहेत. शिवाय दर वर्षी दीड ते दोन कोटींचा चारा विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यात डेअरी फार्म आणि दुग्धोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना विकून चांगला नफा ही कमवत आहे.

Aroli Fodder Group Farming  कशी होते चाऱ्याची सामूहिक शेती?

सामूहिक शेतीच्या या प्रयोगांतर्गत प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतजमिनीवर चारा पिकांची लागवड करण्यासाठी बियाणं आणि इतर संसाधने शेतकऱ्यांनी स्थापन केलेलं 'विश्वास सहकारी शेती संघ' उपलब्ध करून देतो. शेतकऱ्याने फक्त पिकाची निगा राखणे आणि पिकांना पाणी देणे अपेक्षित आहे. दर अडीच महिन्यांनी शेती संघाचे मजूर येऊन नेपियर गवताची कापणी करतात. सर्व 45 शेतकऱ्यांच्या शेतावर कापलेल्या गवताचे आणखी छोटे तुकडे करण्यासाठी विशेष कटाई मशीन देण्यात आली आहे. चारा कापणी करणारे मजूरच गवताची छोट्या तुकड्यात कापणी करून पॅकिंग करतात आणि लगेच पैक केलेला चारा ग्राहकांच्या डेयरी फार्म किंवा गोठ्यापर्यंत ट्रक द्वारे पाठवला जातो.

ठराविक कालावधीनंतर शेती संघाकडून शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांच्या शेतात उत्पादित झालेल्या चाऱ्याचे पैसे जमा केले जातात. विश्वास सहकारी शेती विकास संघाने गेल्या काही वर्षात कोट्यवधी रुपयांचा चारा विक्री करून मोठा नफा तर कमावलाच आहे. शिवाय दुष्काळ सारख्या कठीण परिस्थितीत दुग्धोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी संजीवनी ठरणारा चाराही उपलब्ध करून दिला आहे.

Read Entire Article