Nagpur Drought: नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यांना दुष्काळाची तीव्र झळ; पण अद्याप ना टंचाई आराखडा, ना आमदारांची आढावा बैठक; नेतेमंडळी मात्र पक्षाच्या प्रचारात मग्न?

1 week ago 2
ARTICLE AD

Nagpur Water Scarcity : नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये दुष्काळ (Nagpur Drought) जाहीर असताना येणाऱ्या महिन्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या अनुषंगाने सर्व तालुक्यांसाठी टंचाई आराखडा (Water Shortage Blueprint) तयार करणे आवश्यक आहे. मात्र अद्यापपर्यंत जिल्ह्यातील 9 तालुक्यांचा टंचाई आराखडा अद्यापही तयार झालेला नसल्याची माहिती आहे. त्यामागचे कारण म्हणजे तालुक्याची टंचाई आढावा बैठक (Water Shortage Meetings) आमदारांच्या अध्यक्षतेखाली होणे अपेक्षित असते. मात्र, बरेचसे आमदार कालपर्यंत विधान परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचार आणि नियोजनामध्ये व्यस्त होते, त्यामुळे हिंगणा, नागपूर ग्रामीण, काटोल, नरखेड, कामठी, मौदा, कुही, भिवापूर आणि उमरेड या तालुक्यांमध्ये टंचाई आराखड्यासाठीची आढावा बैठक अजून झालेली नसल्याची माहिती आहे.

Nagpur Drought: 13 तालुक्यांमध्ये दुष्काळ, अद्याप ना टंचाई आराखडा, ना आमदारांची आढावा बैठक

दरम्यान, या टंचाई आढावा बैठकीच्या माध्यमातून तालुक्यात उपलब्ध असलेल्या जलस्त्रोतांचे नियोजन केले जाते. जलस्त्रोतांची दुरुस्ती करणे, विहिरींचे अधिगृहण करणे, गरजेनुसार गावांना वाडीवस्त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करणे अपेक्षित असते. 9 तालुक्यांची आढावा बैठक न झाल्यामुळे या 9 तालुक्याचा टंचाई आराखडा अद्याप ही जिल्हा परिषदेकडे पोहोचलेला नाही.

Wardha News : वर्ध्यातील पिपरीसह तेरा गावाचा पाणीपुरवठा बंद, पाच दिवस राहणार पाणीपुरवठा बंद

वर्धा जिल्ह्यातील पिपरीसह तेरा गावांचा पाणीपुरवठा कालपासून (23 ऑक्टोबर ) पाच दिवसांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे एकूण चौदा गावांचा पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे. सध्या पाईपलाईन सतत लिक होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत होता. सद्यस्थितीत सुरू असलेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने हा पुढाकार घेतला आहे. या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Washim : उत्पादन घटीमूळे सर्वच शेतमालाचे दराला तेजी; हळदी पिकांचे दर वाढ

राज्यात कमी पावसामुळे सर्वच शेतीमालाला फटका बसलाय. कमी उत्पादन होत असल्याने येणार उत्पादन घटीमूळे सर्वच शेतमालाचे दरात तेजी पहावयास मिळतंय. यामध्ये औषधी युक्त आणि मसाला पीक म्हणून हळदी पिकांचे दर वाढ होतांना दिसत आहेत. वाशिमच्या रिसोड बाजारसमितीमध्ये हळदीच्या दरातील तेजी कायम असल्याचं चित्र आहे. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांडी हळदीला प्रतिक्विंटल 23 हजार 475 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. तर कारंजा बाजार समितीतही हळदीचे दर 23 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. अवघ्या चार दिवसांत हळदीच्या दरात प्रतिक्विंटल 664 रुपयांची वाढ झाली आहे. एकीकडे दुष्काळामुळे शेतीसमोर संकट उभे असताना दुसरीकडे हळदीला मिळणाऱ्या चांगल्या भावामुळे उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. तर दुसरीकडे उत्पादन घटीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलीय.

इतर महत्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरच्या उपमहापौरांना खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी; व्हिडिओ कॉलवरून दहा लाख मागितल्याचा राजेंद्र जंजाळांचा आरोप; नेमकं काय घडलं?

Read Entire Article