Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमध्ये अवैध ठरलेल्या मतपत्रिका पाहताच सगळेच चक्रावले, 'त्या' अजब पॅटर्नमुळे भाजपच्या सुधाकर कोहळेंचा खेळ कसा विस्कटला?

3 days ago 2
ARTICLE AD

Nagpur MLC Election Result 2026 Invalid Vote Factor: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत झालेल्या एकूण 1 लाख 65 हजार 541  मतदानापैकी तब्बल 15 हजार 106 मतदान अवैध ठरले आहे. पदवीधरांच्या निवडणुकीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध झालेले मतदान लक्षवेधी ठरले आहे. मात्र, त्यापेक्षाही लक्षवेधी बाब म्हणजे भाजप (BJP) उमेदवार सुधाकर कोहळे (Sudhakar Kohale) यांच्या नावासमोर अनेक मतदारांनी मतपत्रिकेवर केवळ 2 आकडा लिहिल्याने (मुळात पहिल्या पसंतीचा मध्य ते त्यांना 1 हा आकडा लिहिणे अपेक्षित असते) कोहळे यांना मिळू शकणारे हक्काचे मतदान अवैध ठरला आहे. हे मतदान कोहळे यांना मिळाले असते तर त्यांची आघाडी वाढली असती. (Nagpur Vidhanparishad Election 2026)

मिळालेल्या माहितीप्रमाणे या सगळ्या मतपत्रिकांवर सुधाकर कोहळे यांच्या नावासमोर 2 आकडा लिहिल्याने सुमारे तीन हजार मते अवैध ठरली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदारांनी कोहळे यांच्या नावासमोर 1 आकडा न लिहिता 2 आकडा लिहिल्याने फक्त कोहळे यांना मिळू शकणारी जास्तीची आघाडीच कमी झालेली नाही, तर विशिष्ट मतदारांच्या गटाने ही ठरवून केलेली कृती तर नाही ना, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघातील  मतमोजणीच्या दोन्ही फेरीनंतर 1 लाख 50 हजार 874 मतं ही वैध ठरल्यामुळे नियमाप्रमाणे 75 हजार 438 मताचा विजयाचा कोटा ठरला असून दोन्ही उमेदवार तेवढे मतं घेऊ शकलेले नाहीत. त्यामुळे आता बाद फेरी सुरू होऊन दुसऱ्या पसंती क्रमाचे मत मोजण्यास सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीत पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीचे मत मिळून सुधाकर कोहळे यांना 60,945 अभिजीत वंजारी यांना 56,665 मते मिळालेली आहेत. सुधाकर कोहळे सध्या 4280 मतांनी पुढे आहेत. तळाशी असलेले उमेदवार बाद केले जात असून आतापर्यंत 16 उमेदवार बाद करण्यात आले आहेत. मात्र, त्यामध्ये अभिजीत वंजारी हे सुधाकर कोहळे यांच्या पेक्षा काही अंशी जास्त मतदान घेऊन ही कोहळे यांची एकूण आघाडी फारशी कमी करू शकलेले नाहीत. त्यामुळे बाद फेरीत 16 उमेदवार बाद ठरल्यानंतर ही सुधाकर कोहळे यांची आघाडी 4280 मतांची आहे.तिसऱ्या क्रमांकावर असलेले नितेश कराळे यांच्या मतांमधील दुसऱ्या पसंतीच्या मतांवर या निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत नितेश कराळे यांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीच्या मतांमध्ये अभिजीत वंजारी यांना जास्त मतं मिळतात की सुधाकर कोहळेंना यावरच नागपूर पदवीधर मतदार संघाचा निकाल अवलंबून आहे. थोड्यावेळानंतर नितेश कराळे यांच्या 24 हजार 249 मतामध्ये दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू होईल. त्यामध्ये नितेश कराळे यांच्या मतामधील दुसऱ्या पसंतीचे मत कोणाला बळ देतात, यावरच भाजप आणि काँग्रेसचे भवितव्य निश्चित होईल.

आणखी वाचा

Nagpur MLC Election Result 2026: कराळे मास्तरांच्या ओक्साबोक्सी रडण्याने वातावरण पालटलं, नागपूर पदवीधरचं सगळं गणितच बदललं, भाजपच्या सर्व्हेपेक्षाही पुढे निघाले, नेमकं काय घडलं?

Read Entire Article