Nagpur Water Scarcity: राज्यातील बहुतांश जिल्ह्यात दुष्काळाची (Maharashtra Drought) झळ दिवसागणिक अधिक तीव्र होत जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेने (Nagpur Zilla Parishad) ग्रामपंचायतींसाठी 11 कलमी कृती आराखडा तयार केला आहे. पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन, उपलब्ध जलस्रोतांचा आढावा, पाण्याची गळती रोखणे आणि नागरिकांमध्ये पाणी बचतीबाबत जनजागृती करणे, यावर या आराखड्यात भर देण्यात आला आहे. तर दुसरीकडे नागपूर जिल्ह्यात भूजल पातळीत मोठी घसरण झाली असून कामठी आणि पारशिवनीत सर्वाधिक घट झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. (Nagpur Water Scarcity)

Nagpur Water Scarcity: पाणी टंचाई असल्याने ग्रामपंचायत ने एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याच्या सूचना

दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी आपल्या कार्यक्षेत्रातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती संकलित करून गावातील उपलब्ध जलस्रोतांचे नियोजन करावे. गावनिहाय जलस्रोत, पाणीपुरवठा योजना, पाणीसाठा, पाणीटंचाईची शक्यता आणि संभाव्य अडचणींचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीने पाणीपुरवठ्याचे योग्य वेळापत्रक निश्चित करून त्यानुसार पाणीपुरवठा करावा. पाणीपुरवठा वाहिन्या, सार्वजनिक नळ, व्हॉल्व्ह आणि पाण्याच्या टाक्यांमधील गळती शोधून तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. यामुळे उपलब्ध पाण्याचा अपव्यय टाळण्यास मदत होणार आहे.

Water Scarcity: पाणी बचतीसाठी ग्रामसभांमधून जनजागृती

पाणी बचतीचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामसभा, महिला बचत गट, शाळा आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागातून जनजागृती करावी. प्रत्येक घरातील नळाला तोटी लावणे बंधनकारक करावे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. आरओ यंत्रणेतून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा शक्य असेल तेथे योग्य व सुरक्षित पुनर्वापर करण्यासाठी नियोजन करावे. ज्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, तेथे आधीच आवश्यक उपाययोजना करून टंचाई निवारणाचा कृती आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला आहे.

Water Supply Measures: ग्रामपंचायतींना एसओपीनुसार काम करण्याचे निर्देश

पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनांचा नियमित आढावा घेऊन अनुपालन अहवाल संबंधित कार्यालयात सादर करावा. यासाठी गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, जलसुरक्षा रक्षक, पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत स्तरावरील संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन समन्वय साधण्याच्या सूचना आहेत. तर या सर्व उपाययोजनांचा समावेश असलेली प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करून सर्व ग्रामपंचायतींना आवश्यक सूचना देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. पाणीटंचाई उद्भवल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी संभाव्य संकटाचा आधीच अंदाज घेऊन नियोजन करणे आणि नागरिकांना नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे, हा या कृती आराखड्याचा मुख्य उद्देश आहे.

Nagpur Water Scarcity: नागपूर जिल्ह्यात भूजल पातळीत मोठी घसरण; कामठी, पारशिवनीत सर्वाधिक घट

नागपूर जिल्ह्यातील तालुकानिहाय भूजल पातळीच्या आकडेवारीनुसार, अनेक तालुक्यांमध्ये भूजल पातळीत लक्षणीय घसरण झाल्याचे चित्र समोर आले आहे. सप्टेंबर 2026 मधील भूजल पातळीची मागील पाच वर्षांच्या सरासरीशी तुलना केली असता, कामठी आणि पारशिवनी तालुक्यांमध्ये सर्वाधिक घट नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईच्या संभाव्य परिस्थितीबाबत चिंता व्यक्त होत आहे.

उपलब्ध तक्त्यानुसार, कामठी तालुक्यात भूजल पातळीत 1.49 मीटर, तर पारशिवनी तालुक्यात 1.02 मीटरची घट नोंदविण्यात आली आहे. हिंगणा तालुक्यात 1.44 मीटर, नरखेड आणि सावनेर तालुक्यांत प्रत्येकी 1.16 मीटर, तर नागपूर तालुक्यात 1.52 मीटरची घट दर्शविण्यात आली आहे. इतर तालुक्यांमध्येही भूजल पातळीतील घट दिसून येत आहे. रामटेक, काटोल, कळमेश्वर, मौदा, उमरेड, कुही आणि भिवापूर तालुक्यांमध्येही मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत भूजल पातळी कमी असल्याचे शासकीय आडकडेवारी स्पष्ट होते. भूजल पातळीतील हा बदल शेती, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि विहिरींच्या पाणीपातळीवर परिणाम करू शकतो.

पावसाचे प्रमाण, पावसाचे भौगोलिक वितरण, भूजल पुनर्भरण आणि पाण्याचा वाढता उपसा हे भूजल पातळीवर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे भूजल पातळीतील घसरण रोखण्यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे, जलसंधारणाच्या कामांना गती देणे आणि भूजलाचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. दरम्यान, या आकडेवारीच्या आधारे तालुकानिहाय परिस्थितीचे मूल्यमापन करून संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेने पाणीटंचाई बाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या.

राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला