Nana Patekar Death Marathi News: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Marathi Actor Nana Patekar) यांचं आज (8 ऑक्टोबर) निधन झालं आहे. वयाच्या 75 व्या वर्षी नाना पाटेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील डोना पावलामधील घरी नाना पाटेकर हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र याचवेळी नाना पाटेकर यांचा मृत्य झाला. (Veteran Actor Nana Patekar Passes Away Marathi News)

नागपूरमध्ये जलक्रांती परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात नाना पाटेकर यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांच्यासह पाणीसंवर्धनावर काम करणाऱ्या जगभरातील दिग्गजांनी या परिषदेला उपस्थिती लावली होती. यावेळी नाना पाटेकर यांनी एक भीती व्यक्त केली होती. आता नाना पाटेकरांच्या याच विधानाची सध्या चर्चा रंगली आहे. (Nana Patekar Marathi News)

नाना पाटेकर एका कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले होते? (Nana Patekar Death News)

'नटसम्राट' करत असताना मला ज्यावेळी विचारलं, त्यावेळी मी म्हटलं हे नाटक नाही मी करणार, मी सिनेमा करेन. नाटक करत असताना तो तेवढा जीव त्याच्यात प्रत्येक वेळी ओतायचा, तर मला असं वाटतं 10 किंवा 15 किंवा 25 प्रयोगानंतर मी मेलो असतो.एकदा सिनेमामध्ये करताना राहिलं.. डॉक्टर लागू किंवा दत्ता भट किंवा आमचे... चंद्रकांत गोखले, यशवंत दत्त...सगळ्यांनीच नटसम्राट केलं. ज्यांनी ज्यांनी नाटक केले ते सगळे हार्ट अटॅकने गेले. कारण तुम्हाला त्याच्यामध्ये तितकं ओतल्याशिवाय आनंद तो देताच येणार नाही, अशी भीती नाना पाटेकर यांनी काही महिन्यांआधी झालेल्या एका कार्यक्रमात म्हटलं होतं.

डॉ. श्रीराम लागू, दत्ता भट, चंद्रकांत गोखले यांसारख्या दिग्गजांनी हे नाटक केलं आणि प्रत्येक प्रयोगात आपला जीव ओतला. या भूमिकेची तीव्रता एवढी प्रचंड आहे की, कलाकाराच्या हृदयावर त्याचा मोठा ताण येतो. म्हणूनच मी हे नाटक करायला स्पष्ट नकार दिला होता आणि पुढं जाऊन नाटक न करता फक्त सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला. तर सिनेमात सह-अभिनेता राहिलेले दिवंगत अभिनेते विक्रम गोखले हे अभिनयाच्या बाबतीत माझ्यापेक्षा कैक पटीनं सरस होते आणि त्यांच्या अभिनयाची उंची गाठणं कोणालाही शक्य नाही, असंही नाना पाटेकर यांनी म्हटलं होतं. मी नटसम्राट सिनेमा करत असताना रेफरन्स होता. डॉ. लागू, दत्ता भट्ट... त्यामुळे आम्ही केलेलंय ते एवढुसं आहे... तुम्ही त्यांनी केलेलं ओरिजनल दुर्दैवानं पाहिलं नाही, काही मंडळींना बघायला मिळालं असेल... काय काम करायचे बापरे...'पुरूष' करत असताना मध्यांतरामध्ये पडदा बंद झाल्यानंतर एकाही खुर्चीचा आवाज यायचा नाही... त्याचा इम्पॅक्ट इतका असायचा... लोकांना ते सुन्न करायचं... तो जो आनंद मिळायचा ना... अत्युच्च आनंद आहे, नट म्हणून... हाच आनंद 'नाम'चं काम करताना मिळतो...", असंही नाना पाटेकर म्हणाले होते.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? (Devendra Fadnavis On Nana Patekar)

नाना पाटेकरांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया (Devendra Fadnavis On Nana Patekar) दिली आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी आहे. मन प्रचंड दुःखी आहे. नाना जितके पडद्यावर मोठे, तितकेच मनाने सुद्धा मोठे होते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी एक कालखंड दिला. त्यातून प्रामुख्याने एक राष्ट्रभक्त अशीच त्यांची प्रतिमा प्रेक्षकांना भावली. 'क्रांतिवीर' ते 'नटसम्राट' या त्यांच्या प्रवासात जो दमदार आणि कसदार अभिनयाचा पट त्यांनी उभा केला, त्याला तोड नाही. त्यामुळे अभिनेता म्हणून त्यांचे जाणे ही मोठी हानी आहे. परखडपणा, बेधडकपणा हे स्वभावगुण त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवणारे ठरले. पण मी मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यातील हळवा माणूस कायम पाहत आलो आहे. आम्ही जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले, तेव्हा त्याला पाठिंबा देण्यासाठी स्वतः नाना पुढे आले होते. मकरंद अनासपुरेजी आणि त्यांनी सोबत येत 'नाम फाऊंडेशन'ची स्थापना केली आणि स्वतः शिवारात जाऊन काम केले. शेतकऱ्यांसाठी मदत करणे असो, दुष्काळी कालखंडात मदतीचा हात पुढे करणे असो, नाना कायम अग्रणी राहिले. यंदाही आपण दुष्काळाचा सामना करीत असताना नाना कधीच मागे राहिले नसते, पण ते अचानक सोडून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या, चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नाना पाटेकर नेमकं काय म्हणाले होते?, VIDEO:

संबंधित बातमी:

Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?