Nana Patekar Passes Away: नाना पाटेकरांचं निधन, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार भावूक; डोळे पाणावणाऱ्या प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं?

3 weeks ago 3
ARTICLE AD

Nana Patekar Passes Away: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Marathi Actor Nana Patekar) यांचे वयाच्या 75 व्या वर्षी गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन झाले. त्यांच्या या अकस्मात जाण्याने मनोरंजन विश्वासह राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. नानांच्या निधनावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भावूक प्रतिक्रिया देत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Devendra Fadnavis on Nana Patekar: देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक्सवर पोस्ट करत म्हणाले की, "ज्येष्ठ अभिनेते आणि माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी आहे. मन प्रचंड दुःखी आहे. नाना जितके पडद्यावर मोठे, तितकेच मनाने सुद्धा मोठे होते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी एक कालखंड दिला. त्यातून प्रामुख्याने एक राष्ट्रभक्त अशीच त्यांची प्रतिमा प्रेक्षकांना भावली. 'क्रांतिवीर' ते 'नटसम्राट' या त्यांच्या प्रवासात जो दमदार आणि कसदार अभिनयाचा पट त्यांनी उभा केला, त्याला तोड नाही. त्यामुळे अभिनेता म्हणून त्यांचे जाणे ही मोठी हानी आहे.

परखडपणा, बेधडकपणा हे स्वभावगुण त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवणारे ठरले. पण मी मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यातील हळवा माणूस कायम पाहत आलो आहे. आम्ही जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले, तेव्हा त्याला पाठिंबा देण्यासाठी स्वतः नाना पुढे आले होते. मकरंद अनासपुरेजी आणि त्यांनी सोबत येत 'नाम फाऊंडेशन'ची स्थापना केली आणि स्वतः शिवारात जाऊन काम केले.

शेतकऱ्यांसाठी मदत करणे असो, दुष्काळी कालखंडात मदतीचा हात पुढे करणे असो, नाना कायम अग्रणी राहिले. यंदाही आपण दुष्काळाचा सामना करीत असताना नाना कधीच मागे राहिले नसते, पण ते अचानक सोडून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या, चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशी प्रतिकिया त्यांनी दिलीय.

ज्येष्ठ अभिनेते आणि माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी आहे. मन प्रचंड दुःखी आहे. नाना जितके पडद्यावर मोठे, तितकेच मनाने सुद्धा मोठे होते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी एक कालखंड दिला. त्यातून प्रामुख्याने एक राष्ट्रभक्त अशीच त्यांची प्रतिमा प्रेक्षकांना भावली. 'क्रांतिवीर' ते 'नटसम्राट' या त्यांच्या प्रवासात जो दमदार आणि कसदार अभिनयाचा पट त्यांनी उभा केला, त्याला तोड नाही. त्यामुळे अभिनेता म्हणून त्यांचे जाणे ही मोठी हानी आहे. परखडपणा, बेधडकपणा हे स्वभावगुण त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवणारे ठरले. पण मी मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यातील हळवा माणूस कायम पाहत आलो आहे. आम्ही जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले, तेव्हा त्याला पाठिंबा देण्यासाठी स्वतः नाना पुढे आले होते. मकरंद अनासपुरेजी आणि त्यांनी सोबत येत 'नाम फाऊंडेशन'ची स्थापना केली आणि स्वतः शिवारात जाऊन काम केले. शेतकऱ्यांसाठी मदत करणे असो, दुष्काळी कालखंडात मदतीचा हात पुढे करणे असो, नाना कायम अग्रणी राहिले. यंदाही आपण दुष्काळाचा सामना करीत असताना नाना कधीच मागे राहिले नसते, पण ते अचानक सोडून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या, चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांति 🙏
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 8, 2026

Sunetra Pawar on Nana Patekar: अभिनयाचा एक युगपुरुष हरपला : सुनेत्रा पवार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही नाना पाटेकर यांच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. त्या म्हणाल्या, "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला... ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी मनाला अक्षरशः चटका लावणारी आहे. अभिनयाचा अस्सल आविष्कार आणि संवेदनशील सामाजिक जाणिवांचा सुंदर संगम असलेल्या नानांनी रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या दमदार अभिनयाने असंख्य व्यक्तिरेखा अजरामर केल्या. ‘नटसम्राट’, ‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’ यांसारख्या कलाकृतींमधून त्यांनी आपल्या अभिनयाची अमीट छाप उमटवली.

नाना पाटेकर यांचे दादांशी अतिशय जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने झालेली पोकळी माझ्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठीही विशेष दुःखद आहे. कलेसोबतच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी समाजातील वंचित घटक आणि शेतकरी बांधवांसाठी केलेले कार्यही सदैव प्रेरणादायी राहील. आज अभिनयविश्वातील एक संवेदनशील मन, एक दमदार आवाज आणि एक अस्सल कलाकार हरपला आहे. या अष्टपैलू, संवेदनशील कलाकाराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली. नानांच्या स्मृती, त्यांच्या भूमिका आणि त्यांचे अमूल्य योगदान सदैव आपल्या मनात जिवंत राहील."

Eknath Shinde on Nana Patekar: मराठी माणसाचा अभिमान आज हरपला : एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी माणसाचा अभिमान आज हरपला. रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणाऱ्या, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत प्रत्येक बाबतीत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणाऱ्या व प्रखर सामाजिक जाणिवा जपणाऱ्या नाना पाटेकर यांचे अकल्पित निधन हा चित्रपटसृष्टीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि वैयक्तिक माझ्यासाठी फार मोठा धक्का आहे. महाराष्ट्राने आणि देशाने एक संवेदनशील, तगडा अभिनेता व खऱ्या अर्थाने एक 'नटसम्राट' गमावला आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी माणसाचा अभिमान आज हरपला...

नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवातच आमची भेट झाली होती. माझ्या दरेगावी गाळ उपसण्याच्या कामासाठी देखील ते आले होते, तेव्हा पांढऱ्या कपड्यांकडे बघत त्यांनी जाहीरपणे म्हटलं होतं— "एकही डाग नसलेला नेता!" २०२२ मधील राजकीय उठावानंतरच्या पहिल्या खाजगी भेटीत पाठीवर हात ठेवून "काय क्रांतिवीर..." अशी त्यांनी दिलेली साद आणि ती कौतुकाची थाप मी कधीच विसरू शकत नाही. त्या शब्दांनी जनतेसाठी अधिक काम करण्याची ऊर्जा दिली.

तरुणपणी 'क्रांतिवीर', 'तिरंगा', 'प्रहार' यांतील त्यांच्या भूमिकांनी आमच्या पिढीवर गारुड केले. 'हमिदाबाईची कोठी', 'पुरुष', 'तन-माजोरी' ही नाटके आणि 'देऊळ', 'यशवंत', 'वजूद', 'परिंदा' हे चित्रपट त्यांच्या अजरामर भूमिकांमुळे कायम लक्षात राहतील. कुठलाही गॉडफादर नसताना, निव्वळ ताकदीच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा वेगळा ब्रँड उभा केला. बॉलीवूडमध्ये त्यांच्या नावाचा दबदबा होता आणि त्या दबदब्यात मराठी माणसाचा स्वाभिमान अन् बाणा त्यांनी ताठपणे जपला. नाना केवळ महान कलाकार नव्हते, तर ते महाराष्ट्राचा स्वाभिमान होते. 'नाम फाउंडेशन'च्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे त्यांचे काम सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे आहे.

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला आहे. मी एक सच्चा, दिलदार मित्र गमावला आहे. ही हानी कधीही भरून न येणारी आहे. त्यांच्यासारखा अभिनेता शतकातून एकदाच जन्माला येतो. काश्मीरमधील मुलांसाठी शाळा सुरू करण्याचं त्यांचं अखेरचं स्वप्न होतं, ते पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. तीच नाना पाटेकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल. भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो, असे त्यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा

Nana Patekar Passes Away: 'करारी अभिनेता आपण गमावला!' नाना पाटेकर यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातूनही शोक; शरद पवारांसह दिग्गज नेते भावूक, कोण काय म्हणालं?

Read Entire Article