Nana Patekar Passes Away: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. कला क्षेत्रासोबतच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी नानांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली आहे. माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनीही फेसबुक पोस्टद्वारे नाना पाटेकरांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. जाहीर व्यासपीठावरील नानांच्या एका मिश्किल वक्तव्याची आठवण सांगताना धनंजय मुंडे भावुक झाले आहेत.

Dhananjay Munde on Nana Patekar: धनंजय मुंडे यांची फेसबुक पोस्ट

धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटले आहे की, 'मुंडे साहेब उशिरा का आलात ते सांगा?' नाना जाहीर व्यासपीठावरून तुम्ही मला उशिरा आल्याचा जाब गंमतीने का असेना विचारलात, मी उशिरा आलो पण तुम्ही मात्र जायला जरा घाईच केली... मराठी - हिंदी सिनेसृष्टी असो की सामाजिक क्षेत्र, नानांनी आपल्या दमदार कामगिरीने एक अस्सल मराठमोळा ठसा उमटवून तो गेली पाचहून अधिक दशके समृद्ध केला होता. नानांच्या अशा अकाली निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. नानांचे आणि माझे मागील अनेक वर्षांपासून स्नेहसंबंध होते. विविधांगी, सर्जनशील - संवेदनशील नटसम्राट आज हरवला... स्व. नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे ते म्हणाले.

Nitesh Rane on Nana Patekar: नितेश राणेंची प्रतिक्रिया

दरम्यान, मंत्री नितेश राणे एक्सवर पोस्ट करत म्हणाले की, अभिनयातील वादळ, रोखठोक बाणा आणि शेतकऱ्यांच्या हाकेला धावून जाणारा सहृदयी माणूस... ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र पोरका झाला आहे. 'क्रांतिवीर' ते 'नटसम्राट' असा प्रवास गाजवणारा हा खरा राष्ट्रभक्त कलाकार आपल्यात नाही यावर विश्वासच बसत नाही. त्यांच्या जाण्याने झालेली हानी कधीही भरून न येणारी आहे. नानांना विनम्र श्रद्धांजली! भावपूर्ण आदरांजली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

Harshvardhan Sapkal on Nana Patekar: 'कला आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी': हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही नाना पाटेकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची वार्ता अतिशय दुःखद आहे. उत्कृष्ट अभिनय, सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून नाना पाटेकर सदैव आपल्या स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने कला आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा

Nana Patekar Passes Away: 'करारी अभिनेता आपण गमावला!' नाना पाटेकर यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातूनही शोक; शरद पवारांसह दिग्गज नेते भावूक, कोण काय म्हणालं?