Nashik Accident News: त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जाताना गर्दीत धक्का लागला, खाली कोसळली अन् ST बसचं चाक अंगावरून गेलं; 17 वर्षीय युवतीचा मृत्यू, नाशिकमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना

1 month ago 8
ARTICLE AD

Nashik Accident News: नाशिकमधील (Nashik) अत्यंत गजबजलेल्या ठक्कर बाजार बसस्थानकात (Thakkar Bazar Bus Stand) एक काळीज पिळवटून टाकणारी अपघाताची (Accident) घटना घडली आहे. त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी निघालेल्या एका 17 वर्षीय तरुणीचा एसटी बसखाली (ST Bus) चिरडून दुर्दैवी मृत्यू (Tragic Death) झाला. रविवारी रात्री सुमारे नऊ वाजताच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली असून या घटनेमुळे संपूर्ण बसस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा रामभाऊ शेलार (वय 17) असे या मृत तरुणीचे नाव आहे. आकांक्षा ही आपल्या कुटुंबासह त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे दर्शनासाठी जाण्यासाठी ठक्कर बाजार बसस्थानकात आली होती. रात्रीच्या वेळी बसस्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी (Crowd) होती. बस पकडण्यासाठी चाललेल्या लोटालोटीत आकांक्षाला जोरात धक्का लागला आणि ती अचानक खाली कोसळली. याच वेळी स्थानकातून पुढे जाणाऱ्या एसटी बसचे मागील चाक तिच्या अंगावरून गेल्याने तिचा जागीच दुर्दैवी अंत झाला.

Nashik Accident News: लेकीचा अपघात पाहून आईलाही आली भोवळ

अपघातानंतर आकांक्षाच्या चुलत भावाने अत्यंत तत्परता दाखवत तिला तातडीने रिक्षामधून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात (District Hospital) उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. स्वतःच्या डोळ्यांसमोर लेकीचा असा भीषण अपघात आणि मृत्यू पाहिल्याने तिच्या आईला मोठा धक्का बसून त्या जागीच भोवळ येऊन पडल्या.

Nashik Accident News: एसटी महामंडळाचे स्पष्टीकरण

दरम्यान, या प्रकरणी निष्काळजीपणा दाखवणाऱ्या एसटी बसचालकाविरोधात (Bus Driver) गुन्हा दाखल (Case Registered) करण्याची प्रक्रिया नाशिक पोलिसांकडून सुरू आहे. तर दुसरीकडे, प्रवाशांच्या अतिगर्दीमुळे आणि लोटालोटीमुळेच ही दुर्दैवी घटना घडल्याचे स्पष्टीकरण एसटी महामंडळाकडून (MSRTC) देण्यात आले आहे. या घटनेमुळे नाशिककरांमधून आणि प्रवाशांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Jalgaon Accident News: जळगावजवळील पाळधी-तरसोद बायपासवर भीषण अपघात

दरम्यान, जळगावजवळील पाळधी-तरसोद बायपासवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. तरसोद गावाजवळ ट्रॉली आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही चालकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्याचा भराव खचल्याने हा बायपास दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, याच बंद मार्गावर हा भीषण अपघात झाल्याने रस्त्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Nashik News: कुंभ नगरी नाशिकमध्ये नवा वाद, बीफ मार्केट-कत्तलखान्याची 'ती' 5 कोटींची निविदा महापौरांकडून रद्द, म्हणाल्या, 'नाशिकच्या पावित्र्याशी...'

Read Entire Article