Nashik Crime News: नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या नांदगाव (Nandgaon) तालुक्यातील मन्याड चौकी परिसरातून 17 सप्टेंबरच्या मध्यरात्री अचानक बेपत्ता (Missing) झालेली आठ महिन्यांची चिमुरडी अखेर तिसऱ्या दिवशी शेजारच्या येवला तालुक्यातील 'वाईबोथी' (Waibothi) गावात बेवारस अवस्थेत सापडली आहे. चिमुरडी सुखरूप सापडल्याने पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असला, तरी या संपूर्ण घटनेभोवतीचे गूढ आता अधिकच गडद झाले आहे.

Nashik Crime News: तीन दिवस चिमुरडी होती कुठे?

17 सप्टेंबरच्या रात्री गायब झालेली ही चिमुरडी थेट तीन दिवसांनी वाईबोथी गावात कशी पोहोचली? तिचे अपहरण करण्यात आले होते की तिची विक्री करण्याचा प्रयत्न सुरू होता? असे अनेक अनुत्तरित प्रश्न आता उपस्थित होत आहेत. तीन दिवसांचा काळ उलटूनही या प्रकरणातील मुख्य आरोपींचा कोणताही सुगावा पोलिसांना लागलेला नाही.

Nashik Crime News: संशयिताचे टोकाचे पाऊल, नातेवाईकांचा पोलीस तपासावर संताप

या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी संशयित म्हणून श्रावण मोरे नावाच्या व्यक्तीची चौकशी केली होती. मात्र, पोलिसांच्या चौकशीनंतर श्रावण मोरे यांनी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. "चिमुरडी तर सापडली, पण पोलिसांच्या चौकशीमुळे आमच्या घरातील निष्पाप माणसाचा नाहक बळी गेला, त्याचे काय?" असा उद्विग्न सवाल मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी विचारत पोलीस तपासावर (Police Investigation) गंभीर ताशेरे ओढले आहेत.

Nashik Crime News: CCTV फुटेज तपासणी सुरू; पोलिसांचा सावध तपास

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस यंत्रणा आता अत्यंत गुप्तता बाळगून आणि वेगाने तपास करत आहे. नांदगाव ते वाईबोथी या मार्गावरील सर्व मुख्य रस्त्यांचे आणि दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज रविवारी रात्री उशिरापर्यंत तपासण्यात आले आहेत. या फुटेजच्या आधारे आज दिवसभरात आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाचे धागेदोर मिळतील, असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. आता या प्रकरणात नेमकी काय माहिती समोर येणार? याकडे संपूर्ण नांदगावकरांचे लक्ष लागलेले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nashik News: जाहिरात दिसत नाही म्हणून नाशिकमध्ये 50 झाडांची कत्तल; आता जाहिरात व्यावसायिकच प्रशासनाविरोधात आक्रमक, थेट ‘भ्रष्टाचाराचे होर्डिंग’ लावण्याचा इशारा

Nashik Crime News: आई-वडिलांच्या अंथरुणातून 8 महिन्यांची चिमुरडी गायब, पोलिसांच्या चौकशीनंतर संशयिताने टोकाचे पाऊल उचलले अन्...; नाशिकमधील खळबळजनक घटना