Nashik Crime News: खोटे नातेवाईक उभे केले, बोगस आधारकार्ड बनवले अन्...; नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीची 2 लाखांत विक्री, असा झाला पर्दाफाश

2 months ago 4
ARTICLE AD

Nashik Crime News: खोटे दस्तऐवज (Fake Documents) तयार करून आणि खोटे नातेवाईक उभे करून अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देणाऱ्या एका मोठ्या बोगस विवाह रॅकेटचा नाशिक आणि सोलापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला आहे. नाशिक येथील दलालांनी एका 17 वर्षे 8 महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढून, तिची सांगोला तालुक्यातील एका तरुणाशी बनावट लग्नाचा बनाव रचून तब्बल 2 लाख रुपयांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) मुख्य सूत्रधारांसह चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Crime News: देवदर्शनाचे निमित्त अन् दलालांची जाळे फेकले

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेली 17 वर्षीय मुलगी तिच्या आईसोबत नाशिक येथे देवदर्शनासाठी आली होती. तेथे तिची आई आणि ओळखीचा इसम माधव कारभारी वाघ (रा. नाशिक) यांची भेट झाली. माधव वाघ याने मुलीच्या आईला 25 ते 30 हजार रुपयांचे आमिष दाखवून मुलीला दोन तासांसाठी सोबत पाठवण्यास सांगितले. त्यानंतर संशयित माधव वाघ याने इतर सहकाऱ्यांशी संगनमत करून अंजना राजेंद्र देवरे हिला खोटी आई, तर राहुल गया शेळके हिला खोटा मामा बनवले. अल्पवयीन मुलीचे नाव बदलून 'मरीना देवरे' असे सांगत नाशिक न्यायालयात बनावट स्टॅम्प पेपरवर सह्या आणि बोगस आधार कार्ड सादर करून लग्नाचे बनावट कागदपत्र तयार केले.

Nashik Crime News: 2 लाख उकळले अन् मुलीला सांगोल्याला पाठवले

बनावट कागदपत्रे तयार केल्यानंतर या दलालांनी सांगोला तालुक्यातील मानेगाव येथील अमोल दादा कदम याच्याशी तिचे लग्न ठरवले. मध्यस्थांमार्फत अमोल कदम व त्याच्या नातेवाईकांकडून 2 लाख रुपये उकळले. त्यानंतर मुलीला फसवून आणि भीती दाखवून खोटे बोलण्यास सांगत मानेगाव येथे पाठवून दिले.

Nashik Crime News: मुलीच्या हुशारीमुळे झाला पर्दाफाश

मानेगाव येथे पोहोचल्यानंतर अल्पवयीन मुलीला आपल्यासोबत झालेली फसवणूक आणि लग्नाचा संपूर्ण बनाव लक्षात आला. तिने कोणतीही भीती न बाळगता तात्काळ आपल्या खऱ्या आईशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. तसेच, तिने अमोल कदम आणि त्याच्या कुटुंबीयांना आपले वय कमी असल्याचे सांगून लग्नास ठाम नकार दिला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कदम कुटुंबीयांनी पोलिसांच्या मदतीने तिला सोलापूर येथील मुलींच्या निरीक्षण गृहात दाखल केले. सांगोला पोलीस ठाण्यातून शून्य (00) ने वर्ग होऊन आलेल्या फिर्यादीवरून नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात मुख्य सूत्रधारांसह 4 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Nashik Crime News: 'शुभम लोणकर बोलतोय, दोन कोटी दे नाहीतर...'; बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाला धमकी, नाशिकमध्ये खळबळ

Read Entire Article