Nashik Crime News: मित्रांसोबत जमलेली मद्याची मैफल, मद्य पीत असताना झालेला किरकोळ वाद आणि त्यातून उफाळलेल्या रागातून एका मित्राचाच जात्याने ठेचून काटा काढल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. शुक्रवारी (दि. 9) सकाळी द्वारका परिसरातील (Dwarka area) हॉटेल कोर्टयार्डलगतच्या वसाहतीत हा प्रकार उघडकीस आला. विठ्ठल पगारे (वय 38, रा. मुंदडा बाईक शॉपच्यामागे, द्वारका) असे मृत खासगी वाहन चालकाचे नाव आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी (Mumbai Naka Police) वेगाने चक्रे हलवत अवघ्या काही तासांतच 2 ते 3 संशयितांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 8) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मृत विठ्ठल पगारे हे आपल्या काही मित्रांसोबत घरामधे एकत्र मद्यप्राशन करत होते. मद्यप्राशन करत असतानाच त्यांच्यात अचानक कोणत्या तरी कारणावरून क्षुल्लक वाद झाला. हा वाद पाहता पाहता विकोपाला गेला आणि संशयितांनी रागाच्या भरात घरातच असलेल्या धान्याच्या दगडी जात्याने पगारे यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केले. डोक्यावर गंभीर वार झाल्याने पगारे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. यानंतर संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला.

Nashik Crime News: भाच्यामुळे उघडकीस आली घटना

हल्ल्यानंतर प्रचंड अतिरक्तस्राव झाल्याने पगारे रात्रभर मदतीविना घरातच निपचित पडून होते. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांचा भाचा निलेश भामरे हा घरात गेला असता, पगारे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

Nashik Crime News: मुंबई नाका पोलिसांची धडक कारवाई

घटनेचे गांभीर्य ओळखून मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक तपासात मद्यप्राशनादरम्यान झालेल्या वादातूनच ही हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तपासाच्या आधारे अवघ्या काही तासांतच 2 ते 3 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, याप्रकरणी मुंबई नाका पोलीस पुढील तपास करत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: नाशिकमध्ये मोठा घोटाळा, तब्बल 22 मृत रुग्णांवर 6 वर्षांनी दाखवले उपचार; 2 कोटींचा चुना लावणाऱ्या 3 हॉस्पिटल्सवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

Nashik News: चार महिन्यांपासून नाशिकच्या कारागृहात बंदिस्त, दम्याचा त्रास वाढला अन्...; अहिल्यानगर बँक अपहार प्रकरणातील आरोपीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?