Nashik Crime News: मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) शिपाई पदाच्या भरती परीक्षेदरम्यान नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॉलेज रोडवरील एस.एम.आर.के. महाविद्यालयातील (SMRK College) परीक्षा केंद्रावर एका परीक्षार्थीने चक्क बुटात मोबाइल फोन लपवून परीक्षा केंद्रात प्रवेश केल्याचा आरोप आहे. प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर मोबाइलच्या माध्यमातून गुगलवर प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करत असताना पर्यवेक्षकांच्या लक्षात हा प्रकार आला. याप्रकरणी 30 वर्षीय मनोज निवृत्ती वाघ याच्याविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात (Gangapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या कॉलेज रोडवरील एस.एम.आर.के. महाविद्यालयात मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई पदासाठी परीक्षा सुरू असताना नाशिकरोड येथील सह दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तराचे सहायक अधीक्षक तुषार वडघुले आणि प्राध्यापक सौरभ देशपांडे हे पर्यवेक्षक म्हणून कर्तव्यावर होते. परीक्षा सुरू असताना मनोज निवृत्ती वाघ याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पर्यवेक्षकांनी त्याच्यावर लक्ष ठेवले. त्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली. परीक्षा कक्षात मोबाइल नेण्यास स्पष्टपणे मनाई असतानाही त्याने मोबाइल फोन लपवून आत आणल्याचे आढळून आले.

Nashik Crime News: बुटात मोबाइल लपवून आणला

विशेष म्हणजे, परीक्षार्थीने मोबाइल फोन बुटात लपवून परीक्षा केंद्रात आणल्याचा आरोप आहे. प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर त्याने मोबाइलच्या मदतीने प्रश्नांची उत्तरं शोधण्यास सुरुवात केल्याचे पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आले. मोबाइलवर गुगलच्या माध्यमातून प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आढळल्यानंतर परीक्षा केंद्रातच सुरू असलेला हा हायटेक कॉपीचा प्रकार उघडकीस आला.

Nashik Crime News: सुपरवायझरने रंगेहाथ पकडले

मनोज वाघच्या हालचाली लक्षात आल्यानंतर पर्यवेक्षकांनी तत्काळ मोबाइल ताब्यात घेतला आणि संबंधित परीक्षार्थीला पकडले. परीक्षा केंद्रातील हॉल क्रमांक 11 मध्ये हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सहायक अधीक्षक तुषार वडघुले यांनी सरकारतर्फे 27 ऑगस्ट रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मनोज वाघ याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: 'तुमचे आधार कार्ड दहशतवाद्याने वापरले...'; मुंबई ATS चे अधिकारी बनून नाशिकच्या मॅनेजरची तब्बल 89 लाखांची फसवणूक, नेमकं काय घडलं?

Mumbai News: फोटोग्राफी शिक्षकाचा अन् महापौर रितू तावडेंचा फोटो जोडून बनवला व्हिडीओ; पती असल्याचं सांगत जोडली खोटी माहिती, पोलिसांत गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?