Nashik Manisha Jejurkar Case: अटकपूर्व जामीनाची दारे बंद; सुप्रीम कोर्टाचा आदेश अन् डॉक्टर पती पोलिसांच्या ताब्यात, डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणात मोठी कारवाई

1 month ago 6
ARTICLE AD

Nashik Manisha Jejurkar Case: नाशिक येथील प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर (Dr. Manisha Jejurkar) यांच्या मृत्यू प्रकरणात अखेर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेला त्यांचा पती आणि नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नीलेश दत्तात्रय जेजुरकर याला शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 1 ने शुक्रवारी, 18 सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले. द्वारका सर्कल परिसरातून पोलिसांनी ही कारवाई केली.

डॉ. मनीषा जेजुरकर (वय 40) यांचा 6 मार्च 2026 रोजी गंगापूर रोडवरील डी. के. नगर परिसरातील रेवती ब्ल्यू अपार्टमेंटमधील राहत्या घरी मृत्यू झाला होता. सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर मनीषा यांच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीनंतर डॉ. नीलेश जेजुरकर यांच्याविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Nashik Manisha Jejurkar Case: सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

या प्रकरणानंतर डॉ. नीलेश जेजुरकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयीन लढाई सुरू केली होती. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, उच्च न्यायालयातूनही त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला. 17 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याची माहिती समोर आली. त्यामुळे तपास यंत्रणेसमोर हजर होण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

Nashik Manisha Jejurkar Case: शरण न आल्याने पोलिसांनी घेतले ताब्यात

मात्र, न्यायालयीन आदेशानंतरही डॉ. नीलेश जेजुरकर पोलिसांसमोर शरण आले नाहीत. त्यानंतर नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 1 ने त्यांचा शोध घेतला आणि अखेर द्वारका सर्कल परिसरातून त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी सुरू केली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती आहे.

Nashik Manisha Jejurkar Case: पत्नीच्या कुटुंबीयांनी केले होते गंभीर आरोप

डॉ. मनीषा यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीत डॉ. नीलेश हे 2021 पासून पत्नीच्या भावना आणि गरजांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. घरातील अनेक निर्णय घेताना ते एका अन्य महिला डॉक्टरचा सल्ला घेत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या वर्तनामुळे पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद, विसंवाद वाढला आणि मनीषा यांना मानसिक त्रास सहन करावा लागल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. तसेच जानेवारी 2026 मध्ये संबंधित महिला डॉक्टरने मनीषा यांना फोन करून अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोपही फिर्यादी पक्षाने न्यायालयात केला होता. या सर्व आरोपांचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Nashik Manisha Jejurkar Case: तपासाला वेग येण्याची शक्यता

आता डॉ. नीलेश जेजुरकर पोलिसांच्या ताब्यात असल्याने तपासाला वेग येण्याची शक्यता आहे. घटनेपूर्वी पती-पत्नीमध्ये नेमका कोणता वाद झाला होता, घटनेच्या वेळी घरात कोण उपस्थित होते, मृत्यूची नेमकी परिस्थिती काय होती आणि उपलब्ध इलेक्ट्रॉनिक व वैद्यकीय पुराव्यांमधून काय निष्पन्न होते, या प्रश्नांची उत्तरे पोलिस तपासातून समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि न्यायालयीन कार्यवाहीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा

Chhatrapati Sambhajinagar Crime: उद्योजकाच्या मुलीचा फोटो व्हॉट्सॲपच्या DP वर ठेवला, अकाउंटंटकडून अवघ्या दीड तासात 3 कोटी 70 लाख उकळले; छ. संभाजीनगरमध्ये चक्रावणारी घटना

Read Entire Article