Nashik Manisha Jejurkar Case: डॉ. मनीषा जेजुरकर प्रकरणात मोठी कारवाई, पतीनंतर आता 'त्या' महिला डॉक्टरला अटक, दोघांमधील कनेक्शनचा उलगडा होणार?

1 month ago 7
ARTICLE AD

Nashik Manisha Jejurkar Case: नाशिकमधील प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर (Dr. Manisha Jejurkar Case) यांच्या मृत्यू प्रकरणात पोलीस तपासाला (Police Investigation) आता मोठी गती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर डॉ. मनीषा यांचे पती डॉ. नीलेश जेजुरकर यांना गुन्हे शाखेने (Crime Branch) ताब्यात घेतले होते. पतीच्या कसून केलेल्या चौकशीनंतर अखेर या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मानसोपचार विभाग प्रमुख डॉ. स्वाती चव्हाण यांना पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे.

Nashik Manisha Jejurkar Case: पतीच्या चौकशीतून नावाचा उलगडा

डॉ. मनीषा जेजुरकर यांनी 6 मार्च 2026 रोजी गंगापूर रोडवरील राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलले होते. सुरुवातीला या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असली, तरी मनीषा यांच्या कुटुंबीयांनी पती डॉ. नीलेश जेजुरकर आणि डॉ. स्वाती चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले होते. डॉ. नीलेश जेजुरकरांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत डॉ. स्वाती चव्हाण यांचे नाव समोर आले. त्यानंतर नाशिक पोलिसांनी तात्काळ पावले उचलत डॉ. चव्हाण यांना बेड्या ठोकल्या. त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Nashik Manisha Jejurkar Case: नातेवाईकांचे गंभीर आरोप

मृत डॉ. मनीषा यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, डॉ. नीलेश हे पत्नीच्या गरजांकडे दुर्लक्ष करून कौटुंबिक निर्णय घेताना दुसऱ्या एका महिला डॉक्टरचा सल्ला घेत असत. डॉ. नीलेश आणि डॉ. स्वाती चव्हाण यांच्यात जवळीक असल्याचा थेट आरोप कुटुंबीयांनी केला होता. तसेच जानेवारी 2026 मध्ये डॉ. स्वाती चव्हाण यांनी मनीषा यांना फोन करून अत्यंत अपमानास्पद आणि मानसिक त्रास देणारी वक्तव्ये केली होती, ज्यामुळे त्या मोठ्या मानसिक तणावाखाली होत्या. या त्रासाला कंटाळूनच त्यांनी टोकाचे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा फिर्यादी पक्षाने केला आहे.

Nashik Manisha Jejurkar Case: दोघांमधील कनेक्शनचा उलगडा होणार?

पती डॉ. नीलेशनंतर आता डॉ. स्वाती चव्हाण पोलिसांच्या ताब्यात आल्यामुळे या प्रकरणातील अनेक बंद गुपिते बाहेर येण्याची शक्यता आहे. नाशिक पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून चौकशीत काय माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Nashik Crime News: आई-वडिलांच्या शेजारी झोपलेली आठ महिन्यांची चिमुरडी अचानक गायब; तिसऱ्या दिवशी येवल्यात सापडली, पण 'ती' इतक्या दूर पोहोचलीच कशी? नांदगावमधील प्रकरणाचं गूढ आणखी वाढलं

Read Entire Article