Nashik MHADA Scam: नाशिकच्या बहुचर्चित MHADA भूखंड घोटाळ्यात मोठी कारवाई; 1 मंडळ अधिकारी, 3 तलाठी निलंबित, महसूल विभागात खळबळ

1 month ago 9
ARTICLE AD

Nashik MHADA Scam: नाशिकमधील (Nashik) बहुचर्चित म्हाडा भूखंड फसवणूक प्रकरणात (MHADA Fraud Case) अखेर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणात बेकायदेशीरपणे काम केल्याचा ठपका ठेवत एका मंडळ अधिकाऱ्यासह तीन तलाठ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे नाशिकच्या (Nashik News) महसूल विभागात (Revenue Department) प्रचंड खळबळ उडाली आहे.

Nashik MHADA Scam: SIT चौकशीत दोष सिद्ध; निलंबनाचे आदेश जारी

म्हसरूळ, गंगापूर आणि नाशिक शहर-1 येथील तत्कालीन तलाठी आणि अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष तपास पथक अर्थात 'एसआयटी' (SIT) स्थापन करण्यात आली होती. एसआयटीने संबंधित अधिकाऱ्यांच्या काळातील कार्यालयीन दप्तराची सखोल तपासणी केली. या चौकशीदरम्यान संबंधित अधिकारी दोषी आढळल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडून थेट निलंबनाचे आदेश (Suspension Orders) जारी करण्यात आले आहेत.

Nashik MHADA Scam: असा झाला म्हाडाचा भूखंड घोटाळा

शासकीय नियमांनुसार, एक एकरपेक्षा अधिक बांधकाम (Construction) असलेल्या गृहप्रकल्पातील काही घरे 'म्हाडा'ला (MHADA) हस्तांतरित करणे विकासकांसाठी बंधनकारक असते. ही घरे म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना कमी दरात उपलब्ध करून दिली जातात. मात्र, नाशिकमधील या प्रकरणात 1 एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर बांधकाम असूनही, कागदोपत्री फेरफार करून प्रकल्पाचे क्षेत्रफळ 1 एकरपेक्षा कमी असल्याचे दाखवण्यात आले. या फेरफारामुळे म्हाडाला मिळणारी घरे हडप करून मोठा घोटाळा (Scam) करण्यात आला.

Nashik MHADA Scam:  अनेक बांधकाम व्यावसायिक अन् अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

याप्रकरणी यापूर्वीच अनेक बड्या बांधकाम व्यावसायिकांसह (Real Estate Developers) शासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एसआयटीच्या तपासातून अधिकाऱ्यांचे हे बेकायदेशीर कृत्य उघडकीस आल्यानंतर आता प्रत्यक्षात निलंबनाची कारवाई सुरू झाली आहे. यामुळे आगामी काळात या प्रकरणात आणखी कोणकोणत्या बड्या हस्तकांवर कारवाई होणार, याकडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: बुटात मोबाईल लपवला, प्रश्नपत्रिका मिळताच गुगलवर उत्तरं शोधली अन्...; मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई भरती परीक्षेत धक्कादायक प्रकार

Crime News: मुंबईतील लोकल ट्रेनच्या महिला डब्यात नराधम घुसला, मुलीला एकटं पाहून नको ते करण्याचा प्रयत्न, धाडसी मुलीने डोळ्यात बोटं घालून प्रतिकार केला अन्...; नेमकं काय घडलं?

Read Entire Article