Nashik Road Central Jail: नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या (Nashik Road Central Jail) सुरक्षा व्यवस्थेला पुन्हा एकदा धक्का देणारी घटना समोर आली आहे. MD ड्रग्स तस्करीच्या प्रकरणात कारागृहात असलेल्या सनी पगारेचा (Sunny Pagare) कारागृहातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कारागृहातील बॅरेकमधून स्वतःच चित्रीकरण करण्यात आल्याचे या व्हिडीओतून दिसत असल्याने कैद्यापर्यंत मोबाईल फोन पोहोचला कसा, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकारामुळे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, सनी पगारेचा कारागृहातील हा एकमेव व्हिडीओ नसल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वीही सनी पगारे आणि त्याच्या साथीदाराचा कारागृह परिसरात चालतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर आता बॅरेकमधून सेल्फी चित्रीकरण केलेला व्हिडीओ समोर आल्याने कारागृह प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चेला उधाण आले आहे.

Nashik Road Central Jail: कारागृहातील बॅरेकमधून व्हिडीओ शूट

सनी पगारे याचा कारागृहातील खोलीचे आणि स्वतःचे सेल्फी चित्रीकरण केलेला व्हिडीओ केला व्हायरल झाला आहे. त्याच्याकडे मोबाईल फोन उपलब्ध होता का, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. कारागृहाच्या आत मोबाईल वापरण्यास बंदी असतानाही असा व्हिडीओ तयार होणे ही सुरक्षा व्यवस्थेसाठी गंभीर बाब मानली जात आहे. यापूर्वीही नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांकडे मोबाईल फोन आणि अमली पदार्थ आढळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे कारागृहाच्या कडक तपासणी व्यवस्थेतून मोबाईल आतपर्यंत पोहोचत कसे आहेत, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Nashik Road Central Jail: सनी पगारेचा आधीही व्हिडीओ झाला होता व्हायरल

सनी पगारे हा नाशिकमधील चर्चेत असलेल्या MD ड्रग्स प्रकरणातील आरोपी आहे. त्याच्याविरोधात ड्रग्स तस्करीशी संबंधित गंभीर आरोपांवरून कारवाई करण्यात आली आहे. आता त्याच सनी पगारेचा कारागृहातील व्हिडीओ समोर आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. व्हिडीओ नेमका कधी शूट करण्यात आला, त्यासाठी वापरण्यात आलेला मोबाईल कोणाचा होता आणि तो कारागृहात कसा पोहोचला, याची चौकशी होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

Nashik Road Central Jail: कडेकोट सुरक्षा असताना मोबाईल आत गेला कसा?

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कडक सुरक्षा व्यवस्था, तपासणी आणि CCTV देखरेख असल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत कैद्याच्या हातात मोबाईल फोन पोहोचणे आणि त्यातून व्हिडीओ तयार होणे यामुळे सुरक्षा व्यवस्थेतील संभाव्य त्रुटींवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Raigad Diveagar beach Tragedy : समुद्रातून पाच मिनिटात बाहेर काढलं, तरी आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचे प्राण कसे गेले? कारण आलं समोर