Navnath Ban on Vivekanand Patil: पेपरफुटीच्या घटनांनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करत पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून आता राजकीय आणि वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. या आंदोलनाचा मुख्य चेहरा बनलेले विवेकानंद पाटील (Vivekanand Patil) यांनी भाजप (BJP) प्रवक्त्यांकडून होत असलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला होता. उच्च न्यायालयाने (High Court) विद्यार्थ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली असली, तरी जोपर्यंत आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा निर्धार विवेकानंद पाटील यांनी व्यक्त केला होता. लोकशाही आणि संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही मागण्या मांडत असल्याचे सांगत त्यांनी भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्या बौद्धिक कुवतीवर आणि 'उकीरडा बुद्धी' असल्याचा आरोप करत प्रश्न उपस्थित केले होते.

विवेकानंद पाटील यांच्या या टीकेला आता भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले आहे. नवनाथ बन म्हणाले की, एमपीएससी आंदोलनाचा आज तिसरा भांडाफोड केला जाणार असून त्याचा तिसरा पार्ट समोर येणार आहे. काल पुन्हा एकदा माझ्यावर वैयक्तिक टीका करण्यात आली आणि 250 मार्कांचा पेपर सोडवण्यास सांगण्यात आले. मला विवेकानंदला इतकंच सांगायचं आहे की, ज्ञानोबांनी नाथ परंपरा भागवत धर्मापर्यंत आणून ठेवली आहे. आम्ही नाथपंथी आहोत याचा आम्हाला अभिमान आहे आणि मंत्राचा जप करत लहानाचा मोठा झालेला मी आहे.

Navnath Ban on Vivekanand Patil: पुस्तकात वाचून उत्तर दिले तरी चालेल

त्यामुळे विवेकानंद यांनी आपल्या ज्ञानाचा अहंकार करू नये, कारण अहंकाराचा वारा तुम्हाला लागला आहे. मी प्रश्नाचे उत्तर देणं टाळत होतो; मात्र आता माझा एक प्रतिप्रश्न रोहित पवार आणि विवेकानंद पाटील यांना आहे, वाटल्यास त्यांनी पुस्तकात वाचून उत्तर दिले तरी चालेल, मी त्यांना तशी सूट देतो, असे म्हणत नवनाथ बन यांनी थेट आव्हान दिले आहे.

Navnath Ban on Vivekanand Patil: कोणाची अक्कल काढताना 100 वेळा विचार करावा

नवनाथ बन पुढे म्हणाले की, रामरक्षाचा श्लोक तोंडपाठ म्हटला आहे, रोहित पवार आणि विवेकानंद यांनी किमान पुस्तक वाचून बोलावं. 500 मार्कापैकी त्यांना किती मार्क पडतात. चिंचा आणि बोरं विकण्याचे काम रोहित पवार करत होते म्हणून रोहित पवार यांना येणार नाही, असं विवेकानंद पाटील बोलेल. अशात, सोप्पा देतो आणखी, वारकरी संप्रदायाची आमची परंपरा आहे, ज्ञानोबा तुकाराम माऊलींचा गजर करावा. पुस्तकात बघून अर्थ सांगितला तरी चालेल. विवेकानंद यांनी कोणाची अक्कल काढताना 100 वेळा विचार करावा. अहंकार तुमचा आहे म्हणून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतोय.

Navnath Ban on Rohit Pawar: रोहित पवार लक्षात ठेवा...

रोहित पवार यांना दोन एमसीक्यू दिले आहेत. राम रक्षा गीतेचे श्लोक किंवा नाथ संप्रादायातील अभंग बोलून दाखवावे. विवेकानंद मी ओबीसी समाजातून येतो, माझ्या आजोबांनी मराठवाड्यातील स्वातंत्र्यासाठी लढा दिला, तुळशीपत्र ठेवत लढा दिला. तुमच्या आजोबांनी कशी घरं भरली? हे सर्वांना माहिती आहे. रोहित पवार लक्षात ठेवा, आजोबांनी कशी घरं भरली हा इतिहास सर्वांना माहिती आहे. त्यामुळे कोणाची बौद्धिक पातळी काढत असताना विवेकानंद आणि रोहित पवार यांनी 100 वेळा विचार करावा. विवेकानंद बोलला की, गट डची परीक्षा पास होऊ शकत नाही, तुमची हीच परंपरा आहे, सरंजामशाही तुमची होती त्यामुळे तुमचे हेच विचार आहेत. साफसफाई करणाऱ्यांचा अपमान तुम्ही करत आहेत, असा हल्लाबोल देखील नवनाथ बन यांनी केला.

आणखी वाचा

नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज