Navnath Ban on Vivekanand Patil: पेपरफुटीच्या घटनांनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करत पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून आता राजकीय आणि वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. या आंदोलनात आपल्या भाषणाने आणि भाजप प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांना थेट आव्हान देणारे विवेकानंद पाटील (Vivekanand Patil) चांगलेच चर्चेत आले. तर नवनाथ बन यांच्याकडून होत असलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला होता. त्यानंतर विवेकानंद पाटील आणि नवनाथ बन (Navnath Ban) यांच्यातील शाब्दिक युध्द चांगलंच चर्चेत आलं आहे, अशातच नवनाथ बन यांनी एक व्हिडीओ शेअर करत पुन्हा एकदा विवेकानंद पाटील यांच्यासह रोहित पवारांनी डिवचलं आहे.

सोशल मिडीया एक्सवरती एक किर्तनाचा व्हिडीओ शेअर केला आहे, त्याचबरोबर रोहित पवार आणि विवेकानंद पाटील यांना उद्देशून लिहलं आहे, "विवेकानंद पाटील माजगावकर यांनी अर्ध्या हळकुंडानं पिवळं होऊ नये! तुमच्या पाठीशी रोहित पवार असतील, तर माझ्या पाठीशी वारकरी परंपरा आहे, हे लक्षात ठेवा. बाकी, तुम्ही वेड्याला वेद म्हणायला लावले, या अहंकारात राहा. मी वारकऱ्याचा पोरगा आहे. अध्यात्माचं हे वेड मला आज लागलेलं नाही, तर लहानपणापासूनच आहे. विश्वास बसत नसेल तर ३-४ वर्षांपूर्वीचा हा कीर्तनाचा व्हिडिओ कान उघडे ठेवून नीट ऐका आणि यातलं काही रोहित पवारांना कळतं का विचारा!", असंही पुढे बन यांनी म्हटलं आहे.(Navnath Ban)

विवेकानंद पाटील माजगावकर यांनी अर्ध्या हळकुंडानं पिवळं होऊ नये! तुमच्या पाठीशी रोहित पवार असतील, तर माझ्या पाठीशी वारकरी परंपरा आहे, हे लक्षात ठेवा. बाकी, तुम्ही वेड्याला वेद म्हणायला लावले, या अहंकारात राहा. मी वारकऱ्याचा पोरगा आहे. अध्यात्माचं हे वेड मला आज लागलेलं नाही, तर लहानपणापासूनच आहे. विश्वास बसत नसेल तर ३-४ वर्षांपूर्वीचा हा कीर्तनाचा व्हिडिओ कान उघडे ठेवून नीट ऐका आणि यातलं काही रोहित पवारांना कळतं का विचारा! @RRPSpeaks

— Navnath Kamal Uttamrao Ban (@NavnathBanBJP) October 11, 2026

Navnath Ban on Vivekanand Patil: पुस्तकात वाचून उत्तर दिले तरी चालेल

विवेकानंद यांनी आपल्या ज्ञानाचा अहंकार करू नये, कारण अहंकाराचा वारा तुम्हाला लागला आहे. मी प्रश्नाचे उत्तर देणं टाळत होतो; मात्र आता माझा एक प्रतिप्रश्न रोहित पवार आणि विवेकानंद पाटील यांना आहे, वाटल्यास त्यांनी पुस्तकात वाचून उत्तर दिले तरी चालेल, मी त्यांना तशी सूट देतो, असे म्हणत नवनाथ बन यांनी थेट आव्हान दिले आहे.

नवनाथ बन पुढे म्हणाले की, रामरक्षाचा श्लोक तोंडपाठ म्हटला आहे, रोहित पवार आणि विवेकानंद यांनी किमान पुस्तक वाचून बोलावं. 500 मार्कापैकी त्यांना किती मार्क पडतात. चिंचा आणि बोरं विकण्याचे काम रोहित पवार करत होते म्हणून रोहित पवार यांना येणार नाही, असं विवेकानंद पाटील बोलेल. अशात, सोप्पा देतो आणखी, वारकरी संप्रदायाची आमची परंपरा आहे, ज्ञानोबा तुकाराम माऊलींचा गजर करावा. पुस्तकात बघून अर्थ सांगितला तरी चालेल. विवेकानंद यांनी कोणाची अक्कल काढताना 100 वेळा विचार करावा. अहंकार तुमचा आहे म्हणून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतोय.

Navnath Ban on Rohit Pawar: रोहित पवार लक्षात ठेवा...

रोहित पवार यांना दोन एमसीक्यू दिले आहेत. राम रक्षा गीतेचे श्लोक किंवा नाथ संप्रादायातील अभंग बोलून दाखवावे. विवेकानंद मी ओबीसी समाजातून येतो, माझ्या आजोबांनी मराठवाड्यातील स्वातंत्र्यासाठी लढा दिला, तुळशीपत्र ठेवत लढा दिला. तुमच्या आजोबांनी कशी घरं भरली? हे सर्वांना माहिती आहे. रोहित पवार लक्षात ठेवा, आजोबांनी कशी घरं भरली हा इतिहास सर्वांना माहिती आहे. त्यामुळे कोणाची बौद्धिक पातळी काढत असताना विवेकानंद आणि रोहित पवार यांनी 100 वेळा विचार करावा. विवेकानंद बोलला की, गट डची परीक्षा पास होऊ शकत नाही, तुमची हीच परंपरा आहे, सरंजामशाही तुमची होती त्यामुळे तुमचे हेच विचार आहेत. साफसफाई करणाऱ्यांचा अपमान तुम्ही करत आहेत, असा हल्लाबोल देखील नवनाथ बन यांनी केला.