Naxal Attack Verdict: मोठी बातमी! छत्तीसगडमधील 'झीरम घाटी' नक्षलवादी हल्ला प्रकरणात 10 दोषी नक्षलवाद्यांना फाशीची शिक्षा, काँग्रेस नेत्यांसह 29 जणांचा झाला होता मृत्यू

1 month ago 4
ARTICLE AD

Chhattisgarh Naxal Attack Verdict: छत्तीसगडमधील नक्षलवाद संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. छत्तीसगडमधील (Chhattisgarh Naxal Attack)  25 मे 2026 च्या 'झीरम घाटी' (Jhiram Ghati) नक्षलवादी हल्ला प्रकरणात जगदलपूर (छत्तीसगड) एनआयएच्या विशेष न्यायालयाने 10 दोषी नक्षलवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. काल म्हणजेच 16 सप्टेंबर 2026 रोजी या प्रकरणी सुनावणी असून 10 दोषी नक्षलवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. 5 सप्टेंबर रोजी जगदलपूर येथील विशेष 'एनआयए' न्यायालयाने 2013 च्या या अत्यंत भयावह आणि गाजलेल्या नक्षलवादी हल्ल्यात या प्रकरणात 10 नक्षलवाद्यांना दोषी ठरवले होते. मात्र तेव्हा शिक्षा सुनावली नव्हती. अशातच काल सर्व दोषींना मृत्युदंड सुनावले गेले आहे.

Chhattisgarh Naxal Attack Verdict: : नेमकी काय होती घटना?

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील 'दरभा' पोलीस स्टेशन अंतर्गत 'झीरम घाटीत 25 मे 2013 रोजी काँग्रेसच्या 'परिवर्तन यात्रेवर नक्षलवाद्यांनी घेरून हल्ला केला होता. हल्ल्याच्या वेळेला तिथे 200 पेक्षा जास्त नक्षलवादी उपस्थित होते, असे नंतरच्या तपासात समोर आले होते. नियोजनबद्ध पद्धतीने काँग्रेस नेत्यांच्या ताफ्याला चारही बाजूने घेरून बेछूट गोळीबार करण्यात आला होता. तर ताफा थांबवण्यासाठी पहिल्या वाहनाच्या जवळ भूसूरंग स्फोट करण्यात आला होता. त्या हल्ल्यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेत्यांसह सुरक्षा दलाचे अनेक जवान अशा 29 जणांचा मृत्यू झाले होते. 30 पेक्षा जास्त लोक जखमी ही झाले होते. त्या दिवशीचा हल्ला भारतात झालेल्या नक्षलवादी हल्ल्यांमधील सर्वाधिक भीषण हल्ल्यांपैकी एक मानला जातो. त्याच प्रकरणी आता एनआयएच्या विशेष न्यायालयाने दहा नक्षलवाद्यांना दोषी ठरवत मृत्यू दंडाची शिक्षा सुनावली आहे.

Chhattisgarh Naxal Attack: आता पुढे काय होणार?

दोषींना उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मृत्युदंडाची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च न्यायालयाची पुष्टी आवश्यक आहे. झीरम घाटी नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी 25 सप्टेंबर 2014 रोजी 11 अटक आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. तर आरोप पत्रात नाव असलेले 28 आरोपी अद्यापही फरार असून त्यापैकी काही मोठ्या नक्षली कमांडर ने गेल्या काही महिन्यात सुरक्षा दलांसमोर सरेंडरही झाले आहे.

Chhattisgarh Naxal : पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या आणि शिक्षा सुनावण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची नावे

प्रमिला मोडियाम

चैतू लेकाम ऊर्फ मुन्ना

सुमिता ऊर्फ पुनेम मोडियाम

मुक्का मंडावी

कोसा कवासी ऊर्फ कोसराम

आयता मरकाम

मडकामी देवा

जोगा मडकामी

बंजामी सन्ना ऊर्फ चम्रू

महादेव नाग

Chhattisgarh Naxal: झीरम घाटी नक्षली हल्ल्यात मारले गेलेले काँग्रेस नेते कोण होते???

नंदकुमार पटेल - जे छत्तीसगड काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष होते.

महेंद्र कर्मा - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सलवा जुडूम मोहिमेच्या अंमलबजावणीत सक्रिय भूमिका बजावणारे काँग्रेस नेते.

विद्याचरण शुक्ल - माजी केंद्रीय मंत्री आणि छत्तीसगड मधील वरिष्ठ काँग्रेस नेते.

विद्याचरण शुक्ल या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. नंतर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा काही दिवसांनी मृत्यू झाला.

उदय मुदलियार - छत्तीसगड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार

दिनेश पटेल - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल यांचा मुलगा

या हल्ल्यात 29 जण मारले गेले होते. ज्यामध्ये काँग्रेस नेते आणि सुरक्षा दलाच्या जवानांचा समावेश होता...

या भयावह हल्ल्यातून काँग्रेसचे एक आमदार कसे बचावले?

कवासी लखमा झीरम घाटी हल्ल्याच्या वेळी काँग्रेसचे कोंटा मतदारसंघाचे आमदार होते.

ते 1998 पासून कोंटा मतदारसंघाचे आमदार होते.

25 मे 2013 रोजी हल्ल्याच्या वेळी ते काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेच्या ताफ्यातच होते.

नक्षलवाद्यांनी ताफ्यावर हल्ला केल्यानंतर कवासी लखमा आश्चर्यकारकरीत्या बचावले होते.

असे म्हटले जाते की ते ज्या वाहनात होते त्या वाहनातील इतर काही जण मारले गेल्यानंतर ही लखमा यांचा जीव वाचला होता. त्यामुळे हल्ल्यानंतर अनेकांनी कवासी लखमा यांच्या भूमिकेवरही संशय घेतला होता.

पुढच्या वर्षी बीडवरुन थेट पुणे, अजित दादांनी शब्द पाळला; रेल्वेला हिरवी झेंडी दाखवताच सुनेत्रा पवारांना आठवण

Read Entire Article