<p>Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha </p>
<p>कर्जत-भीमाशंकर येथील साय डोंगरात सुरू असलेल्या वृक्षतोडीवरुन सध्या राज्यभर संतापाचे वातावरण आहे. येथील वृक्षतोडीला विरोध करत स्थानिकांनी टोरंट प्रकल्पासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयालाही थेट आपला विरोध दर्शवला आहे. स्थानिकांच्या आंदोलनानंतर येथील वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमी, निसर्ग मित्र आणि आता राजकीय नेतेही पाठिंबा दर्शवत आहेत. कर्जत-भीमाशंकरच्या डोंगरात होत असलेल्या भूमिकेवरुन सरकारला विरोध वाढत असून त्यांच्या पक्षातील काहींनी विरोध केल्याचं चित्र आहे. कबूतर वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेले निलेश चंद्रमुनी भीमाशंकर कर्जत मध्ये वृक्षतोड सुरू असताना कुठे आहेत, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत. भगवान महावीरांचे म्हणणं आहे, जिओ और जीने दो. त्यामुळे, राज ठाकरे जर जंगल वाचवण्यासाठी आंदोलन करत असतील किंवा तो प्रश्न उपस्थित करत असतील तर मी त्यांना पाठिंबा देतो. राज ठाकरे स्वतः पशुप्रेमी आहेत. कबुतराचा विषय तुम्ही वेगळा ठेवा. राज ठाकरे यांनी जी मोहीम आता सुरू केली, जो विषय हाती घेतला, तो वेगळा आहे. मी सगळ्या शिवप्रेमींना महाराष्ट्रातल्या लोकांना आवाहन करतो की, राज ठाकरे यांना समर्थन द्या. प्राणी, झाड वाचवण्यासाठी हा मुद्दा घेत आहेत, असे जैन मुनींनी म्हटले. राज ठाकरेंच्या या मुद्द्याला माझा पाठिंबा आहे, राज ठाकरे जर मला बोलवत असतील तर मी कर्जतला जाण्याच्या तयारीत आहे. पशुपक्षांसाठी जर राज ठाकरे आंदोलन करत असेल तर त्या आंदोलनामध्ये मी त्यांच्यासोबत सहभागी होईल, असेही जैन मुनींनी म्हटले. </p>
<p> </p>
<p> </p>