Palghar Crime News: शिंदे गटात आणखी एक ‘रमेश म्हात्रे’, पालघरमध्ये हॉस्पिटल कर्मचाऱ्याला मारहाण; जखमी गोविंदांच्या बिलावरून वाद झाला अन्...; नेमकं काय घडलं?

1 month ago 6
ARTICLE AD

Palghar Crime News: महाराष्ट्रात सत्ताधारी शिवसेना शिंदे गटातील (Shiv Sena Shinde Faction) पदाधिकाऱ्यांची गुंडगिरी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हात उचलण्याचे प्रकार थांबताना दिसत नाहीत. काही महिन्यांपूर्वी डोंबिवलीतील (Dombivli) नगरसेवक रमेश म्हात्रे (Ramesh Mhatre) यांनी एका रुग्णालयात धिंगाणा घातला होता. आता पालघरमध्ये (Palghar) पुन्हा तसाच प्रकार समोर आला आहे. पालघरमधील रिलीफ हॉस्पिटलमध्ये (Relief Hospital) वैद्यकीय कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार पुत्रासह शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा (Case registered) दाखल करण्यात आला आहे.

Palghar Crime News: बिलाच्या वादातून रुग्णालयातील कर्मचाऱ्याला मारहाण

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पालघर येथील रिलीफ हॉस्पिटलमध्ये एका जखमी गोविंदाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्या वैद्यकीय बिलावरून रुग्णालयाचे प्रशासन आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. या वादानंतर चिडलेल्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या रिसेप्शनिस्टला मारहाण केली. ही संपूर्ण मारहाणीची घटना रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Palghar Crime News: आमदार पुत्रासह 11 जणांवर गुन्हा दाखल

या राड्यानंतर पालघर पोलिसांनी कठोर पावले उचलत शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे (Kundan Sankhe) आणि आमदार राजेंद्र गावित यांचे चिरंजीव रोहित गावित (Rohit Gavit) यांच्यासह 11 जणांविरोधात रात्री उशिरा पालघर पोलीस ठाण्यात (Palghar Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

Palghar Crime News: कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

दरम्यान, 6 जुलै २०२६ रोजी डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात (Shastrinagar Hospital) एका 9 महिन्यांच्या गर्भवती महिलेला दाखल करण्यावरून आणि एनआयसीयू बेड उपलब्ध नसल्याने शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी सहकाऱ्यांसह रुग्णालयात धिंगाणा घालत तीन डॉक्टरांना व वैद्यकीय स्टाफला मारहाण केली होती. त्या घटनेनंतर राज्यभरातील डॉक्टरांनी सुरक्षा आणि संरक्षणाच्या मागणीसाठी तीव्र संताप व्यक्त करत संप पुकारला होता. त्या प्रकरणात विरोधकांच्या दबावानंतर रमेश म्हात्रेला अटक झाली होती. आता पालघरमधील ताज्या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Chhatrapati Sambhajinagar Crime: शिक्षक दाम्पत्याला नोकरीचं आमिष दाखवलं, धर्मांतर केलं अन् तब्बल 5 लाख रुपये उकळले; छ. संभाजीनगरमधील खळबळजनक घटना

Wrestler Ashwini Paul Death Dharashiv News: आधी एकाच चितेवर तिघांना अग्नी, आता अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या लेकीनेही ICU मध्ये प्राण सोडला, नळदुर्ग प्रकरणात महत्त्वाची अपडेट

Read Entire Article