Panvel Karjat Local Train Project मुंबई: मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-III (MUTP-III) अंतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळा (MRVC) द्वारे राबविण्यात येत असलेला पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर (Panvel Karjat Local Train Project) पूर्णत्वाच्या जवळ असून, सप्टेंबर 2026 अखेर त्याने 99% भौतिक प्रगती गाठली आहे. 29.6 किमी लांबीचा दुहेरी मार्ग असलेला हा उपनगरीय कॉरिडॉर 2,782 कोटी रुपयांच्या मंजूर खर्चात विकसित केला जात असून, पनवेल आणि कर्जत दरम्यान एक महत्त्वाचा पर्यायी उपनगरीय रेल्वे मार्ग उपलब्ध करून देईल, ज्यामुळे नवी मुंबई आणि कर्जत-रायगड प्रदेशामधील संपर्क लक्षणीयरीत्या मजबूत होईल.

प्रमुख पायाभूत कामे पूर्ण- (Panvel Karjat Local Train Project)

प्रमुख नागरी अभियांत्रिकी कामे मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली आहेत. सर्व 9 मोठे पूल, 35 छोटे पूल, 5 रेल्वे उड्डाणपूल (ROBs), 16 रेल्वे अंडर ब्रिज (RUBs), आणि पनवेल व करजत येथील दोन्ही रेल्वे फ्लायओव्हर पूर्ण झाले आहेत. खोदकाम, अंतिम बोगदा अस्तरीकरण आणि बॅलेस्टलेस ट्रॅकच्या कामांसह तिन्ही बोगदे पूर्ण झाले आहेत. बोगद्यांमधील इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलची कामे प्रगतीपथावर आहेत.

ट्रॅक जोडणी पूर्णत्वाच्या जवळ- (Panvel Karjat Local Train Project)

ट्रॅकच्या कामात लक्षणीय प्रगती झाली असून, 69.70 किमी पैकी 68.70 किमी ट्रॅक जोडणी पूर्ण झाली आहे. 68.70 किमीवर बॅलेस्ट बेड तयार करणे आणि ट्रॅक नूतनीकरणाची कामे देखील पूर्ण झाली आहेत. पुणे एक्स्प्रेस वे रोड अंडर ब्रिजमधून ट्रॅक जोडणी पूर्ण झाली आहे. पनवेल, चौक आणि मोहपे येथे महत्त्वाचे ट्रॅक बदल आणि पॉइंट इन्सर्शनची कामे देखील यशस्वीरित्या पार पाडण्यात आली आहेत.

स्थानक विकास आणि प्रवासी सुविधा- (Panvel Karjat Local Train Project)

नवीन पनवेल स्थानक इमारत आधीच कार्यान्वित झाली आहे, तर चिखले आणि मोहपे येथील स्थानक इमारती पूर्ण झाल्या आहेत. चौक येथे स्थानक इमारत आणि भुयारी मार्गाची कामे पूर्ण झाली असून, प्लॅटफॉर्म शेड आणि परिसरातील कामे प्रगतीपथावर आहेत. करजत येथे प्लॅटफॉर्म विकास, स्थानक इमारती, प्लॅटफॉर्म संरचना, लिफ्ट, जिने, सरकते जिने आणि इतर प्रवासी सुविधा प्रगत टप्प्यात आहेत.

सिग्नलिंग आणि इतर प्रणाली- (Panvel Karjat Local Train Project)

सिग्नलिंगच्या कामाने सुमारे 95% भौतिक प्रगती गाठली आहे. मोहपे आणि चौक स्थानकांवरील इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसाठी फॅक्टरी अॅक्सेप्टन्स टेस्ट (FAT) आणि साईट अॅक्सेप्टन्स टेस्ट (SAT) यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. दूरसंचार आणि इतर संबंधित प्रणालींची कामे देखील प्रगतीपथावर आहेत.

भूसंपादन आणि मंजुरी- (Panvel Karjat Local Train Project)

आवश्यक असलेली सर्व खाजगी आणि शासकीय जमीन संपादित करण्यात आली आहे. आवश्यक असलेल्या वनजमिनीचा ताबाही मिळाला असून, वनजमिनीवर फॉर्मेशनची कामे पूर्ण झाली आहेत. आवश्यक वन मंजुरी मिळवण्यात आल्या आहेत.

सुधारित संपर्क आणि प्रादेशिक विकास- (Panvel Karjat Local Train Project)

पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर कर्जतच्या दिशेने पर्यायी उपनगरीय रेल्वे मार्ग उपलब्ध करून देईल, ज्यामुळे मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कमधील संपर्क आणि परिचालन लवचिकता सुधारेल. हा कॉरिडॉर अधिक सोयीस्कर आणि वेळेची बचत करणारा प्रवास पर्याय देईल, तसेच नवी मुंबई, रायगड आणि लगतच्या भागात आर्थिक वाढ, निवासी विकास आणि रोजगाराच्या संधींना पाठबळ देईल. हा प्रकल्प सध्या डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO: