Parinay Fuke on CJP Shivaji Park Protest : गेल्या काही वर्षात जंगलात घुसून घुसून नक्षलवाद्यांना मारण्यात आले. जे नक्षल वाचले, लपून राहिले, तेच आता सीजेपीच्या आंदोलनाच्या (CJP Shivaji Park Protest) पाठीमागे राहून अराजकता पसरवू पाहत असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार परिणय फुके (Parinay Fuke) यांनी केला आहे. केंद्रीय आणि राज्याच्या एजेन्सिस त्याचा (Mumbai Police) तपास करत आहेत, त्यामुळे आम्ही या विषयावर जास्त बोलणे योग्य नाही, सरकार कारवाई करेल, असे ही फुके म्हणाले. डाव्या संघटना आणि शहरी नक्षलवाद्यांच्या पाठिंब्याने सुरू असलेल्या या आंदोलनात सहभागी होऊन निरागस तरुणांच्या भवितव्याचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने त्यांनी वेळीच सावध व्हावे, कोणाच्या चिथावणीमुळे देशविरोधी कृत्य करू नये, असेही फुके यांनी तरुणांना सुचवले आहे.

CJP Shivaji Park Protest : आंदोलनाच्या माध्यमातून सीजेपी देशात अराजकता पसरवू पाहात आहे, त्यामागे परकीय फंडिंग

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक आयोगामध्ये केलेल्या कारनाम्यांमुळे अवघ्या देशभरामध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे. कोणत्याही स्थितीत ज्ञानेश कुमार यांना पदावरून दूर करण्यासाठी आता देशातील विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. याची पहिली ठिणगी महाराष्ट्रामध्ये पडली आहे. मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे 'कॉकरोच जनता पार्टी' तर्फे आज (2 ऑक्टोबर) कॉकरोच जनता पार्टीकडून निर्णायक रणशिंग फुंकण्यात आलं असून 'जेल भरो' आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. तर या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाच यावरून राज्याचं राजकारण तापलं असून अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. यावर आता भाजप आमदार परिणय फुकें (Parinay Fuke) यांनी गंभीर आरोप केले आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून सीजेपी देशात अराजकता पसरवू पाहात आहे, त्यामागे परकीय फंडिंग असल्याचा दावा परिणय फुकेंनी केला आहे.

Parinay Fuke: CJPला फॉरेन फँडिंग, निश्चितच प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे

आंदोलन करणे हे प्रत्येकाचा अधिकार असला तरी त्याचे उद्दिष्ट काय, त्यामागे कोणता कट आहे का? त्याची माहिती देशाला असायला हवी. मागचा सीजेपी (CJP) आंदोलन विद्यार्थ्यांसाठी होतं, आता मात्र त्यांचा राजकीय अजेंडा दिसून येत आहे. माझा आरोप आहे की या आंदोलनाच्या माध्यमातून सीजेपी (CJP) देशात अराजकता पसरवू पाहात आहे, त्यामागे परकीय फंडिंग आहे. बांगलादेश सारखी स्थिती निर्माण करण्याचे हे प्रयत्न आहे असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार परिणय फुकेंनी (Parinay fuke) केला आहे. सीजेपीला फॉरेन फँडिंग असून निश्चितच या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकार या प्रकरणाची चौकशी करतील, अशी अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.

Parinay Fuke on CJP Shivaji Park Protest: अभिजित दिपकेंकडून जरांगे यांना कॉपी करण्याचे प्रयत्न, त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा

मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्कवर ठराविक राजकीय कार्यक्रमांना परवानगी मिळते. मनोज जरांगे वारंवार मुंबईत येऊन आंदोलनाची भाषा करत होते. दिपके ही जरांगे यांना कॉपी करण्याचे प्रयत्न करत आहे. दिपके यांच्या भाजपविरोधी अजेंडा आहे. ते फक्त भाजप शासित राज्यात आंदोलन करत आहे. पंजाब आणि झारखंडमध्ये ते काहीच करत नाही. दिपके हे आपचे कार्यकर्ते आहेत. अमेरिकेत जाऊन ते कोणती फंडिंग घेऊन आले, काय मंत्र घेऊन आले हे माहीत नाही. CJP सुरुवातीला आमचा राजकीय अजेंडा नाही, असे सांगत होते. मात्र आता त्यांची ही राजकीय महत्त्वाकांक्षा जागी झाली आहे. त्यांनी खुल्या पद्धतीने राजकीय पक्ष व्हावे, असेही परिणय फुके म्हणाले. पुढे बोलताना परि,णय फुके म्हणाले की दिपके म्हणतात SIR मध्ये मतदार यादीतून बाहेर केलेल्या 13 कोटी मतदारांचे नाव पुन्हा समाविष्ट करा, पण जेव्हा SIR प्रक्रिया राबविली जात होती तेव्हा ते कुठे होते? फक्त एका वर्तमानपत्रात खोटी माहिती छापून येत असेल आणि त्या आधारे हे आंदोलन करत असतील तर हे योग्य नाही. असेही फुकेंनी सांगितलं.

Parinay Fuke on Rohit Pawar: रोहित पवारांनी प्रत्येक तालुक्यात फिरून गुंड तयार केलेत

रोहित पवार यांनी प्रत्येक तालुक्यात फिरून गुंड तयार केले आहेत. त्यांच्या विरोधात कोणी काही बोलले तर त्यांचे गुंड आवाज दाबतात. काल पत्रकारांवर त्यांच्या गुंडांनी हल्ला केला. सर्वांनी निषेध केला. आता रोहित पवार त्या गुंडांचा संबंध एबीव्हीपीशी (ABVP) सोबत जोडत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

CJP Shivaji Park Protest: शिवाजी पार्कवर CJP च्या आंदोलनाला परवानगी नाही, कार्यकर्त्यांवर कारवाई झाली तर काय? वसईतील वकिलांनी घेतली मोठी भूमिका