Parinay Fuke On Rohit Pawar : रोहित पवार (Rohit Pawar) सध्या राहुल गांधींच्या नजरेत येण्यासाठी धडपड करत आहे. ज्या दिवशी पुण्याच्या एमपीएससीच्या आंदोलनात (Pune MPSC Protest) राहुल गांधींचा प्रवेश होईल, त्याच दिवशी रोहित पवारांचा आंदोलन संपुष्टात येईल, असा गंभीर आरोप भाजप नेते परिणय फुके (Parinay Fuke) यांनी केला आहे.. सुप्रिया सुळेसोबत रोहित पवारांचे जमत नसल्यामुळे रोहित पवार काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत, आणि त्याच अनुषंगाने राहुल गांधींची (Rahul Gandhi) जवळीक वाढवण्यासाठी त्यांचे असे प्रयत्न सुरू असल्याचा खळबळजनक आरोपही फुकेंनी केलाय. तर नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून बंडखोरी करणारे अनिल सोले निश्चितच माघार घेतील, असा विश्वासही फुकेंनी व्यक्त केलाय. (Parinay Fuke On Rohit Pawar)

Rahul Gandhi India Aghadi Protest Delhi: रोहिंग्यांना पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठीच राहुल गांधी यांचे आंदोलन

राहुल गांधी मतदार याद्यांमधून 13 कोटी नावे वगळले गेल्याचा आरोप करत असले, तरी त्यामध्ये जुन्या पत्त्यावरून कायमचे निघून गेलेल्यांची संख्या मोठी आहे. जुन्या पत्त्यावरून कायमच्या निघून गेलेल्यांमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांची संख्या जास्त असून त्या रोहिंग्यांना पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठीच राहुल गांधी यांचे आंदोलन सुरू असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते परिणय फुके यांनी केला आहे. सध्या भारताची प्रगती होत आहे, ती अनेक पाश्चिमात्य देशांना बघवत नाही, म्हणून राहुल गांधींना भारताला बदनाम करण्याची सुपारी देण्यात आल्याचा आरोपही फुकेंनी केलाय. काँग्रेस पक्षाच्या मागे अति डाव्यांचं डोकं असून राहुल गांधी दिमागी नक्षल सारखेच वागत असल्याचा आरोप ही फुकेंनी केलाय. ते नागपुरात बोलत होते.

पुण्यातील आंदोलनाचा आज सातवा दिवस- (MPSC Protest Pune)

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार एस.एम जोशी पुलाजवळ एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या प्रमुख मागणीसाठी आंदोलनाला बसलेत आहेत. आज आंदोलनाचा सातवा आणि महत्वाचा दिवस आहे. दरम्यान एकीकडे रोहित पवार मैदानात असतानाच पुण्यात आणखी 2 ठिकाणी एमपीएससी विद्यार्थ्यांची आंदोलनं सुरू आहेत. शास्त्री रोडवरील अहिल्यादेवी अभ्यासिकेसमोर काही परीक्षार्थी आंदोलनाला बसलेत. ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनं परीक्षा घ्यावी, अशी त्यांची मुख्य मागणी आहे. तर अलका टॉकीज चौकात आंदोलन करणाऱ्या परीक्षार्थींना डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनं परीक्षा व्हायला हवीय. त्यामुळे पेपरफुटीमुळे बेजार विद्यार्थ्यांना खरंच न्याय मिळणार की आंदोलनाची हवा नुसतीच विरून जाणार हे पाहावं लागेल.

इतर महत्वाच्या बातम्या

Rohit Pawar and Rajendra Pawar: विरोधक म्हणत असलेला तुझ्या तोंडात असणारा सोन्याचा चमचा शोधतोय, पाठीराख्या बापाचं रोहित पवारांसाठी भावनिक पत्र