Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकरांचा मुलगा देवेंद्र फडणवीसांच्या समोर; मुख्यमंत्र्यांचा शब्द, ठाण्यातील भेटीत काय घडलं?

2 weeks ago 3
ARTICLE AD

Pradeep Purnekar Death Case: शिवसेना ठाकरे गटाचे ठाण्यातील नेते प्रदीप पूर्णेकर (Pradeep Purnekar Death Case) यांच्या हत्ये प्रकरणी आतापर्यंत पाच मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून, पुरवणी एफआयआरमध्ये माजी महापौर मिनाक्षी शिंदे (Meenakshi Shinde) आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे (Rajendra Shinde) यांची नावे आहेत. दरम्यान, प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी त्यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची काल ठाण्यात भेट घेतली.

नवरात्रोत्सवानिमित्त ठाण्यातील हायलँड पार्क, बाळकूम परिसरात देवीच्या दर्शनासाठी देवेंद्र फडणवीस आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांची राम पूर्णेकरांनी भेट घेतली. या भेटीत काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमच्या वडिलांवर अन्याय होऊ देणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी राम पूर्णेकर यांना दिला. तसेच देवेंद्र फडणवीसांनी राम पूर्णेकर यांना दोन दिवसांनी पुन्हा भेटायला बोलावले आहे. (Ram Purnekar Meet Devendra Fadnavis)

पूर्णेकर हत्या प्रकरणात मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदेंची चौकशी- (Pradeep Purnekar Death Case Marathi News)

ठाण्यातील राजकीय नेते प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणाचा तपास आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. 13 आणि 14 ऑक्टोबरला ठाणे गुन्हे शाखेकडून मिनाक्षी शिंदे (Meenkashi Shinde) यांचे पती राजेंद्र शिंदे यांची कसून चौकशी करण्यात आली. पहिल्या दिवशी राजेंद्र शिंदे यांची नऊ तास तर दुसऱ्या दिवशी आठ तास चौकशी करण्यात आली होती. पोलीस इतका वेळ राजेंद्र शिंदे (Rajendra Shinde) यांची चौकशी करत असतील तर प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणात त्यांना काहीतरी ठोस आणि महत्त्वाची माहिती मिळाली असेल. अन्यथा पोलीस विनाकारण कोणाचीही इतका वेळ चौकशी करणार नाहीत. राजेंद्र शिंदे यांची इतका काळ चौकशी सुरु आहे, याचा अर्थ प्रत्येक तासाला पोलिसांना काहीतरी महत्त्वाची माहिती मिळत आहे, अशी शक्यता पूर्णेकर यांचे वकील  ॲडव्होकेट समीर हटणे यांनी बोलून दाखवली.

नेमकं प्रकरण काय? (Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case)

ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्यावर 29 सप्टेंबर रोजी रात्री साधारण साडेनऊच्या सुमारास पाच हल्लेखोरांनी शिरुन पिस्तुलमधून सात राऊंड फायर केले. त्यापैकी चार गोळ्या प्रदीप पूर्णेकर यांच्या शरीरात घुसल्या. पूर्णेकर यांचे कार्यकर्ते कार्यालयात पोहोचले तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांचा तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Eknath Shinde On Thane Pradeep Purnekar Death Case: ठाण्यातील ठाकरेंचे कार्यकर्ते प्रदीप पूर्णेकर प्रकरण; एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बोलले, 15 दिवसांनी म्हणाले...

Read Entire Article