Pradeep Purnekar Death Case मित्रानेच काटा काढला, गोळीबारानंतर रुग्णालयातही घेऊन गेला; प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात नवा अँगल

1 month ago 5
ARTICLE AD

ठाणे : मानपाडा येथील राजकीय गोळीबाराच्या (Firing) घटनेनं मुंबईसह, ठाण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) मानपाडा विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर काल रात्री 9.30 वाजताच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. यावेळी, पूर्णेकर यांच्यावर 5 राऊंड फायर झाले आहेत. त्यापैकी, 2 गोळ्या त्यांना लागल्याची प्राथमिक माहिती असून एक गोळी मानेवर तर दुसरी गोळी पायावर लागल्याचे समोर आले. तसेच धारदार शस्त्राने पाठीवर, पोटावर आणि हातावर वार देखील करण्यात आले आहेत. या हल्ल्यात प्रदीप पूर्णकर यांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी याप्रकरणी, सध्या पप्या शिंदेला संशयित आरोपी अटक केली आहे.

ठाणे महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर 6 ते 7 महिन्यांपासून पप्या शिंदे हे प्रदीप पूर्णेकरांसोबत बोलत नव्हते. मात्र, गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून पप्या शिंदे प्रदीप पूर्णेकरसोबत होता. पप्या शिंदे आणि प्रदीप पुर्णेकर यांची जुनी मैत्री असून चांगले मित्र होते. पप्या शिंदेंवर सन 2004 पासून ते आतापर्यंत 8-9 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळेच, 2014 ला पप्या शिंदेला तडीपार करण्यात आले होते. हल्ल्याच्या वेळी पप्या शिंदे प्रदीप पूर्णेकरसोबतच होता. विशेष म्हणजे, गोळीबाराच्या घटनेनंतर काल रात्री प्रदीप पुर्णेकरला पप्या शिंदेने जवळच्या रुणालयात दाखल केले होते. मात्र, पप्या शिंदेनेच हा गोळीबाराचा प्लॅन आखल्याची माहिती समोर आली आहे.

पूर्णकर हल्ला प्रकरणा एकूण 5 आरोपी असून त्यापैकी 1 अटक आहे, इतर 4 आरोपींचा शोध सुरू आहे. तर अजून दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे.
पप्या शिंदे जो आरोपी आहे, त्यानेच इतर आरोपींना कार्यालयात आणले होते. त्याचा या कटात सहभाग होता, त्यामुळेच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हा पप्या शिंदे आधीपासून प्रदीप यांचा मित्र म्हणून कार्यालयात जाऊन बसला होता. त्याने खूप वेळ गप्पा मारल्यानंतर इतर आरोपींना हिंट दिली. जो कनोजिया उर्फ टल्ली आहे, त्याने गोळ्या मारल्या, सोबत शूटर नावाचा आरोपी होता, या दोघांनी गोळ्या मारल्याची माहिती आहे. तर इतर दोन आरोपींनी चोपर आणि चाकूने हल्ला केला. त्यानंतर, हे चौघे पळून गेले पण पप्या शिंदे तिथेच होता. प्रदीप यांना हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत पप्या शिंदे सोबत होता. पण त्याच्यावर पोलिसांना संशय आला म्हणून त्याला ताब्यात घेऊन अटक केली.

आरोपींच्या अटकेसाठी टीम रवाना

पोलिसांनी चारपैकी एका आरोपीला अटक केली आहे. राजकीय आणि सोशल कारणावरान वाद झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी इतर फरार आरोपींना पकडण्यासाठी क्राइम ब्रांचसह 9 ते 10 टीम रवाना करण्यात आल्या आहेत, लवकरच बाकीचे आरोपी पकडले जातील, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा

Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांना 5 जणांनी संपवलं; आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले...

Read Entire Article