Praful Patel on Rahul Gandhi: राहुल गांधींच्या 'छात्रो की गूंज'मध्ये पंतप्रधान मोदींची मिमिक्री, प्रफुल्ल पटेलांकडून खरपूस समाचार; म्हणाले,'आपण देश वाढवण्यासाठी काम करतो की...'

1 month ago 4
ARTICLE AD

Praful Patel on Rahul Gandhi: काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मध्य प्रदेशातील इंदूर येथे आयोजित 'छात्रों की गूंज' (Chhatron Ki Goonj) या विशेष कार्यक्रमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात त्यांनी शिक्षण व्यवस्था, लोकशाही, पेपरफुटी आणि रोजगाराच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. मात्र, या संपूर्ण कार्यक्रमात सर्वात जास्त चर्चा रंगली ती मंचावरून झालेली पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची मिमिक्री (Mimicry) आणि कॉमेडियन पुलकित मणी (Pulkit Mani) यांच्या सादरीकरणाची. राहुल गांधी मंचावर उपस्थित असतानाच स्टँडअप कॉमेडियन पुलकित मणी याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्याच्या आणि वागण्याच्या पद्धतीची नक्कल केली. या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत कडक शब्दांत समाचार घेतला आहे.

Praful Patel on Rahul Gandhi: राहुल गांधींच्या कार्यक्रमावर प्रफुल पटेल यांची टीका

इंदूर येथील 'छात्रों की गूंज' कार्यक्रमावर बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की, "कालचा इंदूरचा कार्यक्रम हा बालिशपणाचा कार्यक्रम होता. यात मिमिक्री करणं हे सोपं आहे पण यामधून काय साध्य होणार आहे. आपण देश वाढवण्यासाठी काम करतो की, आखाडा चालवण्यासाठी काम करतो?" अशा कडक शब्दांत त्यांनी राहुल गांधी यांचा समाचार घेतला.

Praful Patel: दुष्काळजन्य परिस्थितीवर प्रफुल पटेल यांची प्रतिक्रिया

दरम्यान, महाराष्ट्रात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये गंभीर दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर बोलताना खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले, "राज्य सरकार या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून शेतकरी व सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी लवकरच आवश्यक पावले उचलेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये स्पष्ट केले आहे की, सरकार या परिस्थितीची गंभीर दखल घेत असून तात्काळ आवश्यक त्या सर्व कारवाया व उपाययोजना सुरू करत आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांना, पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांच्या चाऱ्याच्या समस्येवर लवकरात लवकर योग्य दिलासा देईल, याची मला पूर्ण खात्री आहे," असे त्यांनी म्हटले.

Praful Patel: UPI वरील सुधारित MDR शुल्काबाबत प्रफुल पटेल काय म्हणाले?

यूपीआय (UPI) वरील सुधारित एमडीआर (MDR) शुल्काला विरोध करत मुंबईतील पेट्रोल पंप चालकांनी 15 ऑक्टोबरपासून 2 हजारांवरील यूपीआय पेमेंट बंद करण्याचा इशारा दिला आहे. पेट्रोल पंपांना एमडीआरमधून सूट देण्याची मागणी केली जात आहे. यावर बोलताना प्रफुल पटेल म्हणाले, "यूपीआयवरील एमडीआर संदर्भाने केंद्रात संसदीय बोर्डामध्ये सुद्धा माहिती देण्यात आली होती, त्यावेळी कोणीही यावर आक्षेप घेतला नव्हता. तरी सरकार संवेदनशील आहे. याबाबत सरकार विचार करेल, असा आग्रह आम्ही करणार आहोत. जर विचार केला तर 2000 च्या वर यूपीआय वरील देवाणघेवाण ही 4 टक्क्यांच्या वर नसल्याचे दिसून येते. त्यामुळे सामान्य व्यक्तींना आणि लहान व्यापाऱ्यांना कोणतेही नुकसान होणार नाही. तरीसुद्धा याबाबतीत काही अडचण असल्यास केंद्र सरकार सुधारणा करेल," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

आणखी वाचा

Devendra Fadnavis: ‘टीका करणारे दगड फेकतात, मी कासवाप्रमाणे शेलमध्ये असतो’; देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Read Entire Article