Pune Crime News: कुराश अन् ड्रॅगनबोट खेळांची बनावट प्रमाणपत्र दिली अन् 19 जणांनी पुणे पोलीस दलात मिळवली नोकरी, दोघांना बेड्या; नेमकं काय घडलं?

1 month ago 10
ARTICLE AD

Pune Crime News: पुणे पोलीस दलात (Pune Police) बनावट क्रीडा प्रमाणपत्रे (Fake Sports Certificates) सादर करून नोकरी लाटल्याचा एक धक्कादायक गैरप्रकार समोर आला आहे. 'कुराश' (Kurash) आणि 'ड्रॅगनबोट' (Dragon Boat) या खेळांची बोगस प्रमाणपत्रे दाखवून तब्बल 19 उमेदवारांनी खेळाडू आरक्षणाचा (Sports Reservation) लाभ घेत पोलीस दलात नोकरी मिळवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पुणे गुन्हे शाखेने (Crime Branch) धडक कारवाई करत महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश नागर आणि सचिव शिवाजी साळुंखे या दोघांना अटक केली आहे.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, ही बनावट प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराकडून तब्बल 3 ते 5 लाख रुपये उकळण्यात आले होते. याप्रकरणी अटकेत असलेल्या दोघांशिवाय परभणी जिल्हा संघटक कल्याण मुरकुटे, धाराशिव जिल्हा संघटक चांद पाशा शेख यांच्यासह संघटनेच्या इतर काही पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल (Case Registered) करण्यात आले आहेत. या रॅकेटमध्ये क्रीडा विभागातील (Sports Department) काही अधिकारी किंवा कर्मचारी सहभागी आहेत का, याचा सखोल शोध पोलीस घेत आहेत.

Pune Crime News: जिल्ह्यांची जुनी नावे ठरली तपासाचा मुख्य दुवा

हा सर्व घोटाळा उघडकीस आणण्यात एका तांत्रिक चुकीने मोठी भूमिका बजावली. आरोपींनी 2016 आणि 2017 या वर्षांत विविध जिल्ह्यांमध्ये या स्पर्धा पार पडल्याचे दाखवून बनावट प्रमाणपत्रे तयार केली होती. मात्र, ही प्रमाणपत्रे तयार करताना सध्याच्या 'धाराशिव' (Dharashiv) जिल्ह्याचा उल्लेख 'उस्मानाबाद' (Osmanabad) आणि 'छत्रपती संभाजीनगर' (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्याचा उल्लेख 'औरंगाबाद' (Aurangabad) असा करण्यात आला होता. वास्तविक या दोन्ही जिल्ह्यांची नावे 2023 मध्ये बदलण्यात आली आहेत. अलिकडच्या काळात जारी केलेल्या प्रमाणपत्रांवर जुन्या नावांचा वापर झाल्याने पोलिसांचा संशय बळावला आणि हा संपूर्ण गैरप्रकार उघड झाला. पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव व्यतिरिक्त जळगाव, ठाणे, सातारा, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड आणि गोंदिया या जिल्हा संघटनांकडून देण्यात आलेली प्रमाणपत्रेही बनावट असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

Pune Crime News: 19 उमेदवारांवर टांगती तलवार; इतर सरकारी खात्यांचाही तपास सुरू

बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवलेल्या 19 उमेदवारांपैकी 9 उमेदवार सध्या पोलीस प्रशिक्षणासाठी (Police Training) दाखल झाले आहेत. आता या सर्व उमेदवारांवर काय प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केवळ पोलीस दलच नव्हे, तर इतर सरकारी विभागांमध्येही (Government Departments) अशीच बोगस प्रमाणपत्रे सादर करून अनेक जण सेवेत रुजू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

CET Scam Allegation : सीईटी सेल भ्रष्टाचार अन् खंडणीखोरीचं केंद्र, रोहित पवारांचा आरोप; धाराशिवमधील 6 जणांना 100 पर्सेंटाईल कसे? विद्यार्थ्यांचा आरोप

Read Entire Article