Pune DJ Ban Controversy : बापाने मांडीवर प्राण सोडले, लेकाला फिट, DJ मुळे दुसऱ्यांच्या घरी झोपायला जातात, कधी 'रिफ्युजी एरिया'मध्ये काढतात रात्री, भयभीत कदम कुटुंबाची भीषण आपबिती

1 month ago 5
ARTICLE AD

पिंपरी-चिंचवड : सण-उत्सवांच्या काळात वाजवल्या जाणाऱ्या मोठ्या आवाजाच्या डीजे आणि साऊंड सिस्टीममुळे पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात एका कुटुंबावर अत्यंत भीषण वेळ ओढवली आहे. साऊंड सिस्टीमच्या दणदणाटामुळे घरात आजारी व्यक्ती असतानाही ध्वनीप्रदूषण न थांबवल्याने आणि वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने एका वृद्धाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे.(Pune DJ Ban Controversy)

मोशी येथील 'मंत्रा मुव्हमेंट सोसायटी'मध्ये राहणाऱ्या वर्षा गणेश कदम यांच्या कुटुंबावर हा प्रसंग बेतले आहे. कदम यांच्या घरात मुलाला लहानपणापासूनच (वय वर्षे ५ पासून, सध्या १२ वीत) फिट्स येण्याचा आजार आहे. तसेच स्वतः वर्षा कदम यांनाही फिट्सचा त्रास आहे. त्यांच्या घराखालीच अत्यंत मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम आणि डीजे लावला जातो. या दणदणाटामुळे घरातील खिडक्या, दारे आणि भांडी थरथरतात. आवाजाच्या प्रचंड त्रासामुळे कदम कुटुंब गेल्या १० वर्षांपासून सन-उत्सवाच्या काळात घर सोडून दुसरीकडे राहण्यासाठी जाते. कधी नातेवािकांकडे, तर कधी इमारतीच्या ८ व्या मजल्यावरील 'रिफ्युजी एरिया'मध्ये जाऊन त्यांना रात्री काढाव्या लागतात. मुलाची परीक्षा असतानाही या गोंधळामुळे त्याला प्रचंड मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे.(Pune DJ Ban Controversy)

Pune DJ Ban Controversy : ऑक्सिजनवर असलेल्या वडिलांना घरचे वातावरण मिळाले नाही

मागील वर्षी वर्षा कदम यांचे वडील गंभीर आजारी होते. रुग्णालयात उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना घरच्या वातावरणात नेण्याचा सल्ला दिला. वडिलांना ऑक्सिजन लावलेला असताना वर्षा कदम यांनी सोसायटीतील कार्यक्रम आयोजकांना आणि मंडळाला साऊंड सिस्टीमचा आवाज कमी करण्याची किंवा हलवण्याची विनंती केली. मात्र, आयोजकांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत त्यांना इकडे-तिकडे फिरवले.

घरात शांतता न मिळाल्याने वर्षा कदम वडिलांना घेऊन बारामतीजवळील उजनी धरणाच्या फुगवठ्यात असलेल्या आपल्या मूळ गावी निघाल्या. मात्र, गावाकडे जाणारा रस्ता व पूल धोकादायक घोषित झालेला असल्याने तिथे रुग्णवाहिका किंवा कोणतीही वाहतूक व्यवस्था वेळेत पोहचू शकली नाही. अखेर योग्य वैद्यकीय उपचारांअभावी वडिलांनी वर्षा कदम यांच्या हातातच शेवटचा श्वास घेतला. विशेष म्हणजे, वडिलांच्या मृत्यूनंतरही सोसायटीतील आयोजकांनी रात्री १२ वाजेपर्यंत आपला कार्यक्रम आणि धांगडधिंगा सुरूच ठेवला होता. वडिलांच्या उपचारांसाठी कुटुंबाने सुमारे १५ लाख रुपये खर्च केले होते.

Pune DJ Ban Controversy : "धर्माच्या विरोधात आहात" असा शिक्का आणि मानसिक छळ

आपल्या आजारी मुलाच्या आणि वडिलांच्या आरोग्यासाठी जेव्हा जेव्हा कदम कुटुंबाने आवाजाविरुद्ध आवाज उठवला, तेव्हा त्यांना "तुम्ही धर्माच्या विरोधात आहात" असा बोलून गप्प करण्यात आले. "आम्ही स्वतः सर्व सण-उत्सव साजरे करतो, मी स्वतः गणपती उत्सवात सहभागी होऊन पारितोषिके जिंकली आहेत. आम्ही नास्तिक नाही, पण धर्माच्या नावाखाली दुसऱ्याच्या जीवाशी खेळणे कितपत योग्य आहे?" असा उद्विग्न प्रश्न वर्षा कदम यांनी उपस्थित केला आहे.

इतकेच नव्हे तर, सोसायटी कमिटी आणि चेअरमनने "त्रास फक्त तुम्हालाच होतोय, बाकी ९९ लोकांना होत नाही. त्रास होत असेल तर साऊंडप्रूफ काचा बसवून घ्या किंवा दरवाजा बंद करा," असे सांगत हात वर केले. आजूबाजूला भाडेकरू असल्याने सह्या मिळवणेही कठीण झाले आहे. आता तर साऊंड सिस्टीमच्या त्रासामुळे घर विकायची वेळ आली असता, "यांच्या घराखाली साऊंड सिस्टीम असल्याने घर कमी भावात विकले पाहिजे," असा अपप्रचार करून आर्थिक नुकसान करण्याचा प्रयत्नही केला जात आहे.

Pune DJ Ban Controversy : पोलीस आणि प्रशासनाचे दुर्लक्ष; वर्षांनुवर्षे तक्रारी धूळ खात

कदम यांनी २०२३ मध्ये पोलीस ठाण्यात यासंदर्भात पहिली लेखी तक्रार दिली होती. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. नुकतीच ४ सप्टेंबर रोजी त्यांनी 'एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात' पुन्हा तक्रार दाखल केली आहे. पोलीस ११२ क्रमांकावर फोन केल्यानंतर पोलीस येतात, तोवर साऊंड बंद केला जातो आणि पोलीस निघून जाताच पुन्हा सुरू केला जातो. "पोलीस स्टेशनला जाऊनही तुमचे काही होणार नाही," अशी धमकीही आयोजकांकडून दिली जात असल्याचे कदम यांनी सांगितले.

तसेच, सोसायटीची कमिटी बरखास्त होऊन तिथे प्रशासक/अधिकारी बसवण्यात आलेला आहे. त्याला चार महिन्यांपूर्वी नोटीस देऊनही कोणतीही कारवाई झालेली नाही. अनधिकृतपणे स्थापन झालेले हे मंडळ सर्व नियम धाब्यावर बसवून कार्यक्रम करत आहे.

Pune DJ Ban Controversy : प्रशासनाला तातडीच्या कारवाईचे आवाहन

पुण्यातील आणि पिंपरी-चिंचवडमधील डीजेच्या आवाजाचा प्रश्न कायदेशीर मार्गाने सुटेल तेव्हा सुटेल, परंतु या पीडित कुटुंबाचा प्रश्न तातडीने सुटणे गरजेचे आहे. मानवी जीवनाला आणि आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या अशा बेकायदेशीर साऊंड सिस्टीमवर आणि संबंधित आयोजकांवर एमआयडीसी भोसरी पोलीस व पालिका प्रशासन तत्काळ कडक कारवाई करणार का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Pune DJ Ban Controversy : माणूस गेल्यानंतरही सोसायटीवाल्यांनी कार्यक्रम थांबवला नाही

वडिलांचा मृत्यू झाल्यानंतरही सोसायटीमधील कार्यक्रम थांबवण्यात आला नसल्याचा आरोप वर्षा कदम यांनी केला. त्या म्हणाल्या, “माणूस गेल्यानंतरसुद्धा सोसायटीवाल्या लोकांनी कार्यक्रम थांबवला नाही. त्या दिवशीसुद्धा रात्री बारा वाजेपर्यंत कार्यक्रम घेतला. माझा मुलगा बारा वर्षांचा आहे. आम्ही इथे आलो तेव्हा तो पाच वर्षांचा होता. तेव्हापासून त्याला फिट्स येतात,” असे त्यांनी म्हटले.

Pune DJ Ban Controversy : सोसायटीवाले म्हणतात साऊंड प्रुफ काचा लावा

"मी चार दिवसांपूर्वी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे, अशी माहिती देखील वर्षा कदम यांनी दिली. तर त्यांचे पती म्हणाले की, "सोसायटीचे चेअरमन सांगतात की तुम्हाला एकट्याला त्रास होत आहे, बाकीच्यांना होत नाही. ज्यांना त्रास होत आहे, त्यांच्या कागदावर सह्या घेऊन या. आमचे दारं-खिडक्या अक्षरशः व्हायब्रेट होतात, इतक्या मोठ्या प्रमाणात साऊंड लावला जातो आणि सोसायटीचे कमिटी मेंबर म्हणतात, तुमच्या काचा साऊंडप्रूफ करून घ्या,” असे त्यांनी म्हटले.

Read Entire Article