Pune Noise Pollution : DJ विरोधात आणखी एक पुणेकर मैदानात! शरद केळकरांची थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे धाव; MPCB ला नोटीस

1 month ago 4
ARTICLE AD

Pune Noise Pollution News : पुण्यातील ऐतिहासिक गणेशोत्सवातील डीजे (DJ) आणि कर्णकर्कश ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. डीजेच्या दणदणाटाविरोधात आतापर्यंत सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट सातत्याने लढा देत असताना, आता आणखी एका पुणेकराने या गंभीर प्रश्नावर थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (NHRC) दरवाजे ठोठावले आहेत.

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात राहणारे शरद केळकर यांनी पुण्यातील वाढत्या ध्वनी प्रदूषणाबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची अत्यंत गंभीर दखल घेत आयोगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (MPCB) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

NHRC Notice To MPCB : मानवाधिकार आयोगाचे कडक निर्देश

राष्ट्रीय मानवाधिकार आयोग केवळ नोटीस बजावून थांबलेला नाही, तर आयोगाने प्रशासनाला धारेवर धरले आहे. मागील वर्षभरात पुण्यातील ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कोणती ठोस कारवाई करण्यात आली, यंदाच्या गणेशोत्सवात कोणत्या मंडळांना ध्वनिवर्धक अथवा डीजे वापरण्यास परवानगी देण्यात येणार आहे, याचा संपूर्ण सविस्तर अहवाल येत्या सात दिवसांच्या आत सादर करण्याचे कडक निर्देश आयोगाने दिले आहेत.

Vidyanand Bapat Case Reference : विद्यानंद बापट यांच्या प्रकरणाचा आधार

आपल्या तक्रारीत शरद केळकर यांनी पुण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्या प्रकरणाचा विशेष उल्लेख केला आहे. पुण्यात डीजे आणि कर्णकर्कश आवाजाविरोधात बापट यांनी सातत्याने लढा दिला असून, पुणे महानगरपालिकेत त्यांना ज्या परिस्थितीला आणि कारवाईला सामोरे जावे लागले, त्याचा संदर्भ केळकर यांनी आपल्या अर्जात दिला आहे. यावरून त्यांनी स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Pune Ganeshotsav DJ Ban Demand : उत्सवाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ?

पुण्याच्या गणेशोत्सवात जल्लोषाचा आणि उत्साहाचा आवाज दरवर्षी वाढतोय, पण त्याचसोबत ध्वनी प्रदूषणाचा गंभीर प्रश्नही ऐरणीवर आला आहे. डीजेचा दणदणाट असो वा कर्णकर्कश ढोल-ताशे, उत्सवाच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांच्या आणि वृद्धांच्या आरोग्याशी तडजोड कितपत योग्य? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. याच मुद्द्यावरून विद्यानंद बापट आणि शरद केळकर यांनी आक्रमक भूमिका घेत डीजे आणि लाऊडस्पीकरवर पूर्ण बंदी घालण्याची जोरदार मागणी केली आहे.

ही बातमी वाचा :

Pune Ganeshotsav DJ News: स्पीकर असावा पण डीजे नको, गणेशोत्सवात पारंपरिक वाद्य असावे, काँग्रेसनं स्पष्ट केली भूमिका, म्हणाले, पुणे शहराने विश्वाला सार्वजनिक गणेशोत्सव दिला...

Read Entire Article