Pune Santosh Pandit Marathi News: पुण्यातील यू-ट्युबर संतोष पंडित यांची जामीनावर सुटका; कारागृहातून बाहेर येताच म्हणाले...

1 month ago 4
ARTICLE AD

Santosh Pandit Marathi News: पुण्यातील यू-ट्युबर संतोष पंडित (Santosh Pandit) यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. 16 सप्टेंबर रोजी 25 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर संतोष पंडित यांना जामीन मंजूर झाला. त्यानंतर काल (17 सप्टेंबर ) संतोष पंडित यांची येरवडा कारागृहातून सुटका झाली.

जामीन मंजूर करताना न्यायालयाने आरोपीला काही अटी घातल्या आहेत. आरोपीने फिर्यादीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही प्रकारे संपर्क साधू नये, तसेच प्रकरणातील कोणत्याही पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करू नये, अशा अटी घातल्या आहे. दरम्यान, जामीन मंजूर होऊन कारागृहातून सुटका झाल्यानंतर संतोष पंडित यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Santosh Pandit Pune News)

कारागृहातून सुटका, संतोष पंडित काय म्हणाले? (Santosh Pandit Pune News)

जे काही झालं तो मोठा धक्काच होता. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट असून माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. मी जे काही करतोय, तो माझा संवैधानिक अधिकार आहे. मी माझा हा अधिकार बजावत असतो. आधीही बजावत होतो आणि पुढेही बजावर राहणार, असं संतोष पंडित म्हणाले. तसेच मी थांबणार नाही, लोकशाहीत जनता देशाची मालक आहे. जनतेने प्रश्न विचारले पाहिजेत. मी कोणावरही वैयक्तिक टीका केलेली नाही. आपण ज्यांना निवडून देतो, जे लोक सत्तेत आहेत, मग तो कोणताही प्रश्न असो. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायला हवेत, अशी प्रतिक्रिया संतोष पंडित यांनी जामीन मंजूर झाल्यानंतर दिली.

संतोष पंडित यांच्यावर गुन्हा दाखल का झाला, नेमकं प्रकरण काय? (Santosh Pandit Marathi News)

संतोष पंडित हे सातत्याने पुणे महानगरपालिकेच्या विकासकामांबाबत, त्यामधील असणाऱ्या त्रुटींबाबतचे व्हिडीओ  सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. काही दिवसांपूर्वी पंडित यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि शिवराळ मजकूर असलेली व्हिडिओ क्लिप पोस्ट केली होती. मंत्र्यांची जाहीर बदनामी केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी दोन संशयितांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. भाजपचे स्थानिक माजी नगरसेवक सुनील पांडे यांनी संतोष पंडित यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांना बगल देतात, अशा आशयाचा दावा करत या व्हिडीओमध्ये मंत्र्यांवर थेट टीका करण्यात आली होती. मात्र, केवळ टीका न करता त्यात अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ व असभ्य भाषेचा वापर केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Pune Santosh Pandit Arrest: हीच आमची लायकी! संतोष पंडितांनी मोबाईल, बेल्ट काढून घरच्यांना दिला, रात्री एक वाजता पुणे पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?

Read Entire Article