Radhakrishna Vikhe Patil on Nila Vikhe Patil: महाराष्ट्र सोडा विखे-पाटलांच्या घराण्याचा स्वीडनच्या संसदेत डंका, पुतणी खासदार होताच राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ‘तिच्याकडून मला...’

1 month ago 3
ARTICLE AD

Radhakrishna Vikhe Patil on Nila Vikhe Patil: महाराष्ट्राच्या सहकार आणि राजकीय क्षेत्राला मोठी ओळख करून देणाऱ्या विखे-पाटील घराण्याच्या नावाचा तुरा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खोवला गेला आहे. महाराष्ट्रातील नामांकित शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे पाटील यांच्या सुपुत्री नीला विखे पाटील (Nila Vikhe Patil) यांची स्वीडनच्या खासदारपदी (MP) निवड झाली आहे. 13 सप्टेंबर रोजी झालेल्या स्वीडनच्या सार्वत्रिक निवडणुकीत स्टॉकहोम शहर मतदारसंघातून 41 वर्षीय नीला यांनी भव्य विजय मिळवला. या ऐतिहासिक यशाबद्दल त्यांचे काका आणि महाराष्ट्राचे महसूल व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनस्वी आनंद व्यक्त केला असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Radhakrishna Vikhe Patil on Nila Vikhe Patil: "महाराष्ट्रात व्यक्तीद्वेष, तिकडे कार्यपद्धती वेगळी"

प्रवरानगर येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्यात हजेरी लावल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, "नीला स्वीडनच्या खासदारपदी निवडून आल्याचा मला मनस्वी आनंद झाला आहे. ती सुरुवातीपासूनच सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात अत्यंत सक्रिय होती. तिने यापूर्वी स्वीडनच्या पंतप्रधानांची राजकीय सल्लागार म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. निलाकडून मला मोठ्या अपेक्षा आहेत."

पुढे बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणावरही टिप्पणी केली. "आता नीलाला मी काही सल्ला देण्याची गरज उरलेली नाही. आपल्याकडची आणि तिकडची कार्यपद्धती अतिशय वेगळी आहे. आपल्याकडे व्यक्तीद्वेषाने भरलेले राजकीय वातावरण आहे, त्यामुळे सामाजिक आणि राजकीय जीवनात मोठी आव्हाने असतात," असे मत त्यांनी व्यक्त केले.

Who is Nila Vikhe Patil: कोण आहेत नीला विखे पाटील?

आशियातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नीला या पणती आहेत. तसेच माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या त्या नात आहेत. आपल्या कुटुंबाचा सहकार आणि सेवेचा हाच राजकीय वारसा पुढे नेणाऱ्या नीला विखे पाटील आता स्वीडनच्या 249 सदस्यांच्या 'रिक्सडॅग'मध्ये देशाचा आवाज बनणार आहेत.

स्वीडनमध्ये जन्म झालेल्या नीला यांनी अहमदनगरमध्ये सुरुवातीचे बालपण घालवले. त्यानंतर गोथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून अर्थशास्त्र व कायद्यासह पदवी आणि 'एमबीए' पूर्ण केले. तसेच माद्रिद येथील युनिव्हर्सिटी डी कॉम्प्ल्युटेन्स येथूनही एमबीए पदवी संपादन केली. स्वीडनचे माजी पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांच्या कार्यकाळात त्यांनी पंतप्रधान कार्यालयात वित्त, कर आणि गृहनिर्माण क्षेत्रांसाठी सल्लागार म्हणून काम केले आहे. त्या स्टॉकहोम नगर परिषदेच्या सदस्य होत्या. त्या गेल्या 15 वर्षांपासून पर्यावरणवादी विचारसरणीच्या 'ग्रीन पार्टी'मध्ये सक्रिय आहेत. तसेच त्या जागतिक दर्जाच्या 'प्राइसवॉटरहाऊसकूपर्स' या संस्थेत सल्लागार म्हणूनही कार्यरत आहेत. स्वीडनच्या यंदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत 'ग्रीन पार्टी'सह विरोधी आघाडीने 176 जागा जिंकून निसटते बहुमत मिळवले आहे, ज्यामध्ये नीला विखे पाटील यांचा विजय महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरला आहे.

आणखी वाचा

Devendra Fadnavis: ‘टीका करणारे दगड फेकतात, मी कासवाप्रमाणे शेलमध्ये असतो’; देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Read Entire Article