Rahul Gandhi Phone Call Rahul Bondre : आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही कुठं जाऊ नका,राहुल गांधी यांचा राहुल बोंद्रेंना फोन

1 month ago 3
ARTICLE AD
<p>Rahul Gandhi Phone Call Rahul Bondre : आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही कुठं जाऊ नका,राहुल गांधी यांचा राहुल बोंद्रेंना फोन</p> <p>गेल्या दोन महिन्यापासून चिखली मतदारसंघातील राजकारण हा चर्चेचा विषय राज्यभरात ठरला आहे. चिखलीचे काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी काल फेसबुक लाईव्ह करत भाजपमध्ये पक्ष प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं होतं. उद्या म्हणजे 22 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होऊ शकतो असं म्हणत चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांनी सुद्धा दुजोरा दिला होता. मात्र आज सायंकाळी या संपूर्ण घटनाक्रमात एक मोठा ट्विस्ट आला. राहुल गांधींनी थेट राहुल बोंद्रेंना व्हाट्सअप कॉल करत त्यांची मनधरणी केली. याशिवाय "हार के बाद ही जीत है" असा कानमंत्र ही दिला...!... या संपूर्ण घटनाक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मध्यस्थी केल्याची माहिती त्यांनी दिली.राहुल गांधींशी बोलताना राहुल बोंद्रे यांनी "मै सबकुछ न्योछावर कर दूंगा लेकिन आपके साथ लढाई लढूंगा....!" असंही म्हटलं. या संपूर्ण घटनाक्रमाचा व फोन कॉल चा व्हिडिओ राहुल बोंद्रे यांच्या कार्यालयाकडून फेसबुक वर टाकण्यात आला आहे. त्यामुळे आता राहुल बोंद्रे हे काँग्रेसमध्येच राहतात की आणखी काही राजकीय घडामोडी घडतात ते पाहावं लागेल.&nbsp;</p>
Read Entire Article