Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

3 weeks ago 2
ARTICLE AD
<p>Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले</p> <p>मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार &nbsp;यांच्या विरोधात मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे &nbsp;यांनी आज मुंबईत गर्जना मोर्चा काढला. ठाकरे बंधूंच्या या मोर्चाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्यातील इतर विरोधी पक्षाने देखील ठाकरे बंधूंच्या या गर्जना मोर्चाला उपस्थित राहत पाठिंबा दिला. मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत ठाकरे बंधूंनी मोर्चा काढला. त्यानंतर राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल करत विविध मुद्द्यांवर भाष्य केले.देशभरात मतचोरीमुळे वातावरण तापलंय. मी 2017 पासून सांगतोय, की मतचोरी सुरु आहे. त्यादरम्यान, मी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, तृणमृल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांना भेटलो होतो. मी सतत सांगत होतो. मतांमध्ये चोरी होत आहे. त्यावेळी मी निवडणुकांवर बहिष्कार टाका, असं म्हणत होतो, असं राज ठाकरे म्हणाले. ⁠मत अशी कमी होऊ शकत नाही. या ठिकाणी सर्व बसलेले नेते देखील त्यावेळी होते, असं राज ठाकरेंनी सांगितले. 2024 च्या निवडणुकीत संपूर्ण बहुमत महायुतीला मिळालं, पण महाराष्ट्रात जल्लोष नाही. लोकांमध्ये उत्साह नाही, जल्लोष नाही. संपूर्ण सन्नाटा होता, मग हा कोणता विजय? 40 ते 60 लाख मतदार वाढवले गेले. लोकसभा आणि विधानसभेत 1 कोटी मत वाढली. तुमची इतकी मत वाढली आता सगळ्या गोष्टी उघड झाल्या.</p> <p>&nbsp;</p>
Read Entire Article