Raj Thackeray Gyanesh Kumar: राज ठाकरेंची मोठी घोषणा, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा काढणार

1 month ago 7
ARTICLE AD

Raj Thackeray  Gyanesh Kumar: केंद्रीय निवडणूक आयोगातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. देशभरातील विरोध पक्ष ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांच्यावर तुटून पडले आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही एक फेसबुक पोस्ट लिहून निवडणूक आयोगाच्या (Election commission) कारभारावर ताशेरे ओढले होते. यानंतर शनिवारी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोशल मिडीयावर दुसरी पोस्ट लिहत एक मोठी घोषणा केली आहे. राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात येत्या 4 ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. आज सकाळीच संजय राऊत आणि राज ठाकरे यांची भेट देखील झाली होती.  त्यानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली.  हा मोर्चा एका पक्षापुरता न राहता तर तमाम राजकीय व्यवस्थेचा आणि जनतेचा आवाज ठरेल यासाठी सर्व राजकीय पक्षांना या मोर्चामध्ये सहभागी व्हावे यासाठी  देखील संवाद साधला जाणार असल्याची माहिती आहे. या सगळ्यावर आता सत्ताधारी महायुतीतील नेते काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Maharashtra Politics news)

Maharashtra Politics news:  राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटले आहे?

सस्नेह जय महाराष्ट्र,
देशातील सत्ताधारी पक्षाची जणू काही आपण शाखाच आहोत अशा पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’च्या नावाखाली मतदारांची जी घोर फसवणूक केली आहे त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना येत्या 4 ऑक्टोबर 2026 ला मुंबईत एक जनमोर्चा काढणार आहे. या मोर्चाच्या आयोजनात जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा पुढाकार असला तरी हा जनतेचा मोर्चा आहे आणि हा एका पक्षापुरता न राहता तो तमाम राजकीय व्यवस्थेचा आणि जनतेचा आवाज ठरेल यासाठी आम्ही सर्व राजकीय पक्षांना या मोर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी संवाद साधणार आहोत.
अर्थात महाराष्ट्रातील जनतेलाच आवाहन आहे की  आपण मोठ्या संख्येने या मोर्च्यात सहभागी व्हा. बाकी मोर्च्याची वेळ आणि ठिकाण लवकरच कळवण्यात येईल. तेंव्हा एसआयआरविरोधातील या जन मोर्च्यात भेटूया ! या , देशातील लोकशाही आणि या देशाचे संविधान वाचवण्यासाठी एकत्र या !
राज ठाकरे - उद्धव ठाकरे

आणखी वाचा

Raj Thackeray: सत्तेतील रेडे 'ज्ञानेशा'कडून वेद वदवतायंत; नुकतीच झालेली संपूर्ण SIR प्रक्रिया रद्द करा, राज ठाकरेंची मागणी

Read Entire Article