Raj Thackeray On MPSC Protest Pune: पुण्यातील एस.एम. जोशी पुलावर सुरु असलेल्या एमपीएससी आंदोलनाचा (MPSC Protest Pune) आज नववा दिवस आहे. काल पुणे पोलिसांनी एस.एम जोशी पूल मोकळा करा, असं आंदोलक विद्यार्थ्यांना सांगितलं. मात्र जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही. तोपर्यंत विद्यार्थी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आंदोलनावर ठाम आहेत. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना लवकरच चांगली बातमी येणार, अशी माहिती दिली आहे. (Pune MPSC Protest Marathi News)

मुख्यमंत्री सकारात्मक, राज ठाकरे काय म्हणाले? (Raj Thackeray On MPSC Protest Pune)

5 ऑक्टोबर 2026 ला मी जेव्हा पुण्यात एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली तेव्हा मी तुमचं म्हणणं, तुमच्या रास्त अपेक्षा याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलेन असं आश्वस्त केलं होतं. स्वतःचा राहता जिल्हा, तालुका, आपलं घर तसेच आपल्या कुटुंबाला सोडून नोकरीसाठी राब राब राहणाऱ्या तरुणांना आणि तरुणींना पाहिलं की जिवाची कालवाकालव होते. म्हणून आज या विषयावर माझी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस देखील पूर्णपणे सकारात्मक आहेत हे जाणवलं. आणि येत्या काही दिवसांत MPSC च्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यां संदर्भात एक चांगली बातमी येईल अशी अपेक्षा आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली. तेव्हा विद्यार्थ्यांनी देखील संयम ठेवावा, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.

सस्नेह जय महाराष्ट्र, ५ ऑक्टोबर २०२६ ला मी जेंव्हा पुण्यात एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली तेंव्हा मी तुमचं म्हणणं, तुमच्या रास्त अपेक्षा याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलेन असं आश्वस्त केलं होतं. स्वतःचा राहता जिल्हा, तालुका, आपलं घर तसेच आपल्या कुटुंबाला सोडून नोकरीसाठी राब राब राहणाऱ्या तरुणांना आणि तरुणींना पाहिलं की जिवाची कालवाकालव होते. म्हणून आज या विषयावर माझी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. ते देखील पूर्णपणे सकारात्मक आहेत हे जाणवलं. आणि येत्या काही दिवसांत MPSC च्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यां संदर्भात एक चांगली बातमी येईल अशी अपेक्षा आहे . तेंव्हा विद्यार्थ्यांनी देखील संयम ठेवावा. राज ठाकरे ।

— Raj Thackeray (@RajThackeray) October 9, 2026

राज ठाकरे आंदोलनस्थळी काय म्हणाले होते? (Raj Thackeray MPSC Marathi News)

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या एमपीएससी आंदोलनाला (MPSC Protest Pune) समर्थन देण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हजेरी लावली होती. मात्र यावेळी राज ठाकरेंनी अतिशय परखड शब्दात विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती समजून सांगितली होती. दुसरं कोणतंही सरकार आलं तरीही 70 हजार पदांची भरती होणार नाही हे लक्षात ठेवा अशी वस्तुस्थिती राज ठाकरेंनी मांडली होती. विशेष म्हणजे रोहित पवारांसमोर राज ठाकरेंनी ही वास्तवदर्शी भाष्य केलं होतं. 2023 मध्ये मनोज जरांगेंच्या मंचावरही राज ठाकरेंनी अशीच परिस्थितीची जाणीव करून दिली होती. आरक्षणाचा निर्णय हा मंचावर बसून किंवा आंदोलनातून होणार नाही. तर तो न्यायालयातून सुटू शकतो, असं थेट भाष्य राज ठाकरेंनी मनोज जरांगेंच्या मंचावर केलं होतं. त्यामुळे आपण बोलतो ते कटू असतं लोकांना ते हळूहळू कळतं अशा शब्दात राज ठाकरेंनी MPSC च्या विद्यार्थ्यांशी बोलताना परिस्थिती मांडली होती. त्यानंतर आता राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली असून मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Raj Thackeray MPSC Protest Pune: MPSC च्या अध्यक्षांना हटवणे राज्य सरकारच्या हातात नाही; काय करायचं?, राज ठाकरेंनी सिक्रेट सांगितलं!