Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: मुख्य निवडणूक आयुक्ताविरोधातील ठाकरे बंधूंचा आज मुंबईत गर्जना मोर्चा काढण्यात आला.मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत हा मोर्चा काढला गेला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य नेते देखील ठाकरे बंधूंच्या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चात सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. राज ठाकरेंच्या कारमध्ये बाळासाहेब थोरात पुढच्या सीटवर बसले. तर ठाकरे बंधू मागच्या सीटवर बसून आंदोलनस्थळ असलेल्या मेट्रो सिनेमाजवळ गेले.

गर्जना मोर्चातून राज ठाकरे काय काय म्हणाले? (Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha)

देशभरात मतचोरीमुळे वातावरण तापलंय. मी 2017 पासून सांगतोय, की मतचोरी सुरु आहे. त्यादरम्यान, मी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, तृणमृल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांना भेटलो होतो. मी सतत सांगत होतो. मतांमध्ये चोरी होत आहे. त्यावेळी मी निवडणुकांवर बहिष्कार टाका, असं म्हणत होतो, असं राज ठाकरे म्हणाले. मत अशी कमी होऊ शकत नाही. या ठिकाणी सर्व बसलेले नेते देखील त्यावेळी होते, असं राज ठाकरेंनी सांगितले. 2024 ची निवडणूक संपूर्ण बहुमत, पण महाराष्ट्रात जल्लोष नाही. लोकांमध्ये उत्साह नाही, जल्लोष नाही. संपूर्ण सन्नाटा होता, मग हा कोणता विजय? 40 ते 60 लाख मतदार वाढवले गेले. लोकसभा आणि विधानसभेत 1 कोटी मत वाढली. तुमची इतकी मत वाढली आता सगळ्या गोष्टी उघड झाल्या. देशातील एसआयआर बेकायदेशीर आहे. माझ्या फक्त दोनच मागण्या आहेत. त्यातील पहिली म्हणजे महाराष्ट्रात जो एसआयआर झाला, तो रद्द करावा. तसेच दुसरी मागणी म्हणजे यापुढे बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे. यामुळे दूध का दूध आणि पानी का पानी होईल, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच माझी सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की, दिल्लीत जाऊन बोला. उद्या कोणाची सत्ता येऊ दे... काही फरक पडत नाही. पण सत्ता योग्य मार्गाने आली पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.