Raksha Bandhan Buldhana News: महाराष्ट्रात या गावातील कोणतीही बहीण भावाला राखी बांधत नाही; 735 वर्षांपासूनची परंपरा, नेमकं कारण काय?

2 months ago 11
ARTICLE AD

Rakshabandhan Buldhana News: आज श्रावणी पौर्णिमा....अर्थात रक्षाबंधन.....बहीण भावाच्या प्रेमाचा दिवस. आज देशभरात बहीण भावाला राखी बांधून...भावाला गोड पदार्थ भरवून हा सण मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येतो. मात्र बुलढान्यातील एका गावात (वानखेड ता. संग्रामपूर ) रक्षाबंधन साजरा करण्यात येत नाही. या गावात कोणतीच बहीण आपल्या भावाला राखी बांधत नाही. यामागचं कारण नक्की जाणून घ्या...

बुलढाणा जिल्ह्यातील हे आहे वानखेड नावाचं गाव......जेमतेम दहा हजार लोकसंख्या असलेलं गाव.....या गावात पालिवाल समाज मोठ्या प्रमाणात आहे.....आजपासून तब्बल 735 वर्षांपूर्वी राजस्थान च्या पाली राज्यातून हा समाज व्यवसायानिमित्त या गावात वास्तव्यास आला आणि तेव्हापासून  इकडेच आहे. 735 वर्षांपूर्वी राजस्थानातील पाली राज्यावर दिल्ली सल्तनतीतील जलालुद्दीन खिलजीच्या काळातील शासकांनी हल्ला केला होता व त्या राज्यात मोठा नरसंहार झाला होता. प्रचंड जीवित हानी झाली होती. पाली राज्यातून अनेक नागरिकांनी देशाच्या इतर भागात पलायन केलं होतं आणि तो दिवस होता श्रावणी पौर्णिमेचा....(Rakshabandhan 2026)

पूर्वजांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करून "एकता दिन"  म्हणून साजरा करतात- (Rakshabandhan Buldhana News)

1291 च्या दरम्यान राजस्थानच्या पाली राज्यात मोठ्या प्रमाणात ब्राह्मण समाज वास्तव्यास होता. शांत व वैभव संपन्न असा हा समाज असल्याने दिल्ली सल्तनतीतील जलालुद्दीन खिलजी व त्याच्या सैन्याची या समाजावर  नजर पडली आणि 1291 च्या दरम्यान या पाली राज्यावर त्यांनी  हल्ला केला. या हल्ल्यात हजारो नागरिकांची हत्या या आक्रमणात झाली. आणि त्यामुळे या परिसरातील पालिवाल ब्राम्हण समाज नंतर व्यवसायानिमित्त देशभर विखुरला गेला आणि अजूनही आपल्या व्यवसायावर हा समाज उदरनिर्वाह करतो. 735 वर्षांपूर्वी श्रावणी पोर्णिमेच्या दिवशी अर्थात रक्षाबंधनाच्या दिवशी आपले हजारो वंशज मारले गेल्यानें या समाजाकडून रक्षाबंधन साजरं न करता गावातील पालिवाल समाजाचे लोक दरवर्षी एका मंदिरात जमतात व आपल्या पूर्वजांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करून "एकता दिन"  म्हणून साजरा करतात. या दिवशी गावातील एकही बहीण आपल्या भावाला राखी बांधत नाही किंवा घरात गोडधोड पदार्थ भरवत नाही. हा सण मुघलांच्या या हल्ल्याच्या निषेधार्ह दिन म्हणून ही साजरा करतात.

भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन. देशभरात सगळीकडे या सणाचा उत्साह पाहायला मिळत आहेत. परंतु इतिहासातील अनेक घटनांनी कुणाचं जीवन कसं बदललं आहे हे यावरुन दिसून येत. संपूर्ण जगात भावा-बहिणीच्या प्रेमाचा दिवस कुठे मोठ्या उत्साहात साजरा होतो तर कुठे आपल्या पूर्वजांच्या आठवणीत साजरा होतो. संपूर्ण जगात भावाबहिणीच्या प्रेमाचं दिवस कुठ आपल्या पूर्वजांच्या आठवणीत साजरा होतो तर कुठे मोठ्या उत्साहात...इतिहासातील अनेक घटनांनी कुणाचं जीवन कसं बदललं आहे हे यावरून दिसून येतं.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडमोडी, VIDEO:

Read Entire Article