Ramdas Athawale On Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरुन राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अंतरवली सराटीत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही, असी भूमिका त्यांनी घेतली असून आमरण उपोषणाचा आजचा (31 ऑगस्ट) तिसरा दिवस आहे. असे असताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे असून मनोज जरांगे पाटील यांच्या 99 मुद्द्यांशी आपण सहमत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. (Ramdas Athawale On Maratha Aarakshan)

दरम्यान, सर्व मराठा समाजाला ओबीसीमध्ये (OBC) समाविष्ट करण्याची एक मागणी मान्य करणं अत्यंत अशक्य असून ही मागणी न्यायालयात टिकणारी नसल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केलंय. ते जळगावमध्ये (Jalgaon) बोलत होते.

....पण संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी म्हणता येणार नाही (Ramdas Athawale On Maratha Aarakshan)

दरम्यान, ज्या मराठा कुटुंबांच्या कुणबी नोंदी आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना आरक्षणाचा लाभ मिळायला हवा, मात्र संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी म्हणता येणार नाही, अशी भूमिका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मांडली आहे. तर EWS आणि केंद्र सरकारच्या 10 टक्के आरक्षणाचा मराठा समाजाला फायदा होऊ शकतो. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, अशी सरकारची भूमिका असल्याने या विषयावर चर्चा करून सरकारने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षाही रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या मागण्या कोणत्या?

- निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीने शोधलेल्या 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे सर्वांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात यावे.

- हैदराबाद गॅझेटिअरचा केवळ जीआर काढण्यात आला आहे, परंतु त्यातील संख्येनुसार मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आलेली नाहीत. नोंदींनुसार मराठवाड्यातील संपूर्ण मराठा समाजाला तात्काळ कुणबी प्रमाणपत्रे द्यावीत आणि त्याची व्हॅलिडिटी कशी देणार, हे स्पष्ट करावे.

- सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान आणि औंध-पुणे-बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेटिअरचा तातडीने जीआर काढून त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी.

- मराठा समाजासाठी मराठा आणि कुणबी असे स्वतंत्र मंत्रालय तत्काळ स्थापन करण्यात यावे.

- अंतरवाली सराटीतील गुन्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत.

- ज्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत, त्यांना प्रमाणपत्रे द्यावीत. तसेच ज्यांना प्रमाणपत्रे मिळाली आहेत, त्यांना लगेचच हॅलिडिटी प्रमाणपत्र द्यावे.

- सारथी संस्थेच्या सर्व प्रलंबित योजना सुरू कराव्यात, डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्तीचा निधी तातडीने वितरीत करावा आणि वसतिगृहांच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

- मराठा समाजाला ओबीसींच्या सर्व सोयी-सुविधा आणि सवलती देण्याबाबत काढलेल्या जीआरची प्रभावी अंमलबजावणी करावी.

- शिंदे समितीला कुणबी नोंदी शोधण्यासाठी आजपासूनच पुन्हा जुने रेकॉर्ड तपासण्याचे निर्देश द्यावेत.

- EWS, SEBC आणि ESBC प्रवर्गातून निवड झालेल्या मराठा तरुणांना आजच्या आज नियुक्ती पत्रे देण्यात यावीत.

- अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत ज्या मराठा तरुणांनी वाहने घेतली आहेत, त्यांचा प्रलंबित असलेला संपूर्ण व्याज परतावा सरकारने जमा करावा.

- सगे-सोयरे बाबतच्या अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी.

- मराठा आरक्षणाच्या लढ्यात बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील सदस्यांना तात्काळ शासकीय नोकरी आणि आर्थिक मदत देण्यात यावी.

- राज्यामधील जात पडताळणी समिती बरखास्त करा.

इतर महत्वाच्या बातम्या

जरांगे पाटलांना भेटणार, 24 तासात योग्य निर्णय घेणार, सरकार मराठा समाजाच्या मागण्यांसोबत, उदय सामंताचं मोठं वक्तव्य