मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला. माझ्या नावाने भाजपकडून 500 कोटी रुपये घेतल्याचं बोललं जात असल्याचा खळबळजनक आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. याचा पुरावा म्हणून ऑडीओ क्लिप असल्याचे देखील जरांगे (Manoj Jarange) यांनी म्हटले. आता या कथित ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रामदास कदम (Ramdas Kadam on Manoj Jarange) पत्रकार परिषदेवेळी म्हणाले, मनोज जरांगे पाटील साहेब आज तुम्ही जी क्लिप दाखवली ती १४/१०/२०२४ ची आहे. तुम्ही ही क्लिप दोन वर्ष का ठेवली. आज एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत, मराठा समाजाला न्याय देण्यासाठी त्यांनी योगदान दिलं आहे, विनोद पाटीलला विचारून घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा कायदेशीर अभ्यासाबाबत चर्चा कोणाच्या बंगल्यावर झाल्या, असा सवालही रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे.(Ramdas Kadam on Manoj Jarange)

एक गोष्ट मला पहिल्यांदा जरांगे पाटील साहेब यांना सांगायला हवी की आपण आज मराठा समाजाला न्याय देण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेताय, कष्ट घेताय, उपोषण करताय, असं असताना ही जी क्लिप आपण आज दाखवली, ती क्लिप 14/10/2024 ची आहे. मग हे दोन ते अडीच वर्ष क्लिप आपण आपल्याकडे का ठेवली होती? यामागचं नेमकं कारण काय? ते पण कळलं पाहिजे ना. 2024, 25, 26 आणि म्हणून काही गोष्टी स्पष्ट होणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे साहेब, आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि आता उपमुख्यमंत्री आहेत. मराठा समाजाला न्याय देण्याबाबत एकनाथ शिंदे साहेबांचं देखील योगदान आहे. त्यांचं योगदान आहे. जरांगे पाटील साहेब, एक गोष्ट तुम्हाला मी आणखी एक सांगतोय. विनोद पाटलांना विचारून घ्या. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्यासाठी कायदेशीर अभ्यास हा कोणाच्या बंगल्यावर झाला, त्यांना विचारून घ्या विनोद पाटलांना, ते सांगतील. आम्ही पडद्याच्या आड आहोत आणि म्हणून एक गोष्ट मला याच्यात स्पष्ट केली पाहिजे की, दोन-दोन वर्षे, अडीच वर्षे झाली या क्लिपला. ही क्लिप आत्ता कशी बाहेर पडली? त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर लोकसभा निवडणुका झाल्या. मग तेव्हा ही क्लिप बाहेर का नाही आली? अर्थात, हे जे तीन-चार लोक जे बोलतायत, ते भाजपचेच आहेत. त्याबद्दल काही दुमत नाहीये. मी स्पष्टपणानं सांगतोय मीदेखील. कारण मी ऐकलेली आहे असंही पुढे कदम म्हणालेत.

यामध्ये कॉन्फरन्सवरती बोलतात ते, त्यामध्ये संभाजीनगर आहे, ठाण्याचं कनेक्शन आहे, मुंबईचं आहे आणि त्या क्लिपमध्ये जी बाब त्यांनी सांगितली, उद्या कोणी म्हणू शकतो, कॉन्फरन्स होती, याला हजार कोटी आम्ही दिले, याला दोन हजार कोटी दिले, याला ५ हजार कोटी दिले. शेंडा आणि बुंधा काही नाही ना त्याला. मग दोन आणि अडीच वर्षे आपण का थांबलो होतो? आपल्या एका समाजाच्या नेत्यावरती अशा पद्धतीनं काही मंडळींचा आरोप करून त्यांना बदनाम करत असतील, तर जरांगेजी, आपण एकनाथ शिंदेच्या बाजूने उभे राहायला हवं होतं असं माझं ठाम मत आहे. दुसरी गोष्ट आणखी एक क्लिप बाहेर येणार आहे आपली. आपल्या गोपनीय मीटिंगमध्ये भाजपचे आमदार बसलेले आहेत. मी त्यांचं नाव घेत नाही आता आणि त्या मीटिंगमध्ये आपण असं बोललात की, या मीटिंगमध्ये निम्मे पेक्षा जास्त एकनाथ शिंदे यांचे चमचे बसलेत, असं आपण बोललात. माझ्याकडे आहे ते. मी कधीही हवेमध्ये बोललो नाही. हवेवरती तलवार चालवली नाही. मी जबाबदारीने बोललोय. त्याच्यामध्ये इंगळे आहेत. इंगळेनी ज्या मीटिंगमध्ये आपल्याला सांगितलं, आपल्याला बोलले ते, हे ठीक नाही आहे म्हणून, आपण तपासून घ्या, असंही कदम पुढे म्हणालेत.

भाजपच्या आमदारांना सोबत घेऊन, एकनाथ शिंदेचे चमचे म्हणून तुम्ही काय लोकांना म्हणत असाल. तर मग नेमकी एकनाथ शिंदे यांच्याबाबत तुमची भूमिका काय आहे, हे स्पष्ट झालं. आमचा मराठा समाजाचा नेताच आमच्या मराठा समाजाच्या नेत्याला संपवतोय, असं म्हणायचं का मग? माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, नको, छत्रपती शिवाजी महाराज असताना मराठा एकत्र लढले होते. छत्रपतींनी मराठ्यांना घेऊन अनेक लढाया-लढाया लागल्या. पण सुदैवानं आज तुमच्या पाठीशी मोठा समाज उभा होता. पाटील साहेब. आपण समाजामध्ये फुट पडेल. असं आपल्याला होता कामा नये. मला वाईट वाटलं की, भाजपचा एक आमदार बसतो आपल्या गोपनीय मिटिंगमध्ये, गुप्त मिटिंगमध्ये. आता मिटिंगमध्ये आपण एकनाथ शिंदेचे चमचे बसलेत म्हणून बोललात. मला खूप दुःख झालं. खूप वाईट वाटलं.

माझी आपल्याला विनंती आहे, आज आपण एकनाथजी बोललात, देवेंद्रजी बोललात, मला खूप समाधान वाटलं. मला बरं वाटलं. महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे. तेव्हा या क्लिपची म्हणजे ३ वर्षे आधीची असुदे. पण माझी लेखी मागणी असेल आजच्या आज, त्या क्लिपची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे. ही जी महिला म्हटली, डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या मार्फत आम्ही पैसे पोहोचवलोय म्हणून मग ती महिला कोण आहे ? ते समोर आलं पाहिजे. पैसे कुठं दिले? ते समोर आलं पाहिजे. त्या महिलेकडे पैसे कुठून आले द्यायला? ते तपासलं पाहिजे आणि जर का असा कुठला पक्ष एकनाथ शिंदेंना बदनाम करण्यासाठी अशा क्लिप तयार करून जर का बाहेर पाठवून एकनाथ शिंदेंची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते देखील आपण सगळ्या समाज एकत्र येऊन आपण हाणून पाडलं पाहिजे. हे आता आपलं आजचं पहिलं काम आहे. आणि म्हणून याची तपशीलवार चौकशी व्हावी, मी स्वतः माझी मागणी आहे. मी आजच शिंदेंना पण भेटेन. मी पण मुख्यमंत्री आणि निवेदन देईन. मी अमित शाह साहेबांना निवेदन देईन. अगदी सखोल चौकशी याची, आपण या क्लिपची चौकशीकरून घेऊ. आणि लवकर दूध का दूध, पाणी का पाणी होईल, अशी माझी अपेक्षा आहे, असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.