Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा

3 weeks ago 2
ARTICLE AD

Rohit Pawar MPSC agitation Pune: महाराष्ट्र लोक सेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे पाठवला आहे. मंगळवारी होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय न घेतला  गेल्यास पुणे शहर बंद पाडू, असा इशारा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिला आहे. गेल्या पाच दिवसांपासून रोहित पवार हे एमपीएससीच्या (MPSC) विद्यार्थ्यांसोबत पुण्यातील (Pune news) एस.एम जोशी पुलाजवळ सुरु असलेल्या आंदोलनात बसून आहेत. मात्र, आता राज्य सरकारने विवेक भीमनवार (Vivek Bhimanwar) यांचा राजीनामा तातडीने घ्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. ते मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Politics news)

परवा संध्याकाळी साडेसात ते आठ वाजता भीमनवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवला आहे. पण मुख्यमंत्र्यांना राजीनामा पाठवून काही होणार नाही. भीमनवार यांनी आपला राजीनामा राज्यपालांना पाठवायला हवा होता. आता हा विषय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आहे. पण देवेंद्र फडणवीस यांना एकच भीती आहे की, आता जर भीमनवार यांचा राजीनामा घेतला तर उद्या सामान्य लोक कोणाचाही राजीनामा मागतील. उद्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामाही मागितला जाऊ शकतो. त्यामुळे आता हा सगळा खेळ इगोचा झाला आहे. भीमनवार यांनी राज्यपालांकडे देणे अपेक्षित होते. पण शेवटी मित्र सत्तेत आहे, मुख्यमंत्री आहे. त्यामुळे भीमनवार यांनी खेळी खेळली असावी. मी राजीनामा दिलाय, मी यात नाही, तुम्हाला मला वाचवायचं आहे. त्यांनी हा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलला आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.  आजच्या कॅबिनेटममध्ये भीमनवार यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा होईल. मुख्यमंत्र्यांनी त्यावर आज निर्णय घेतला नाही तर आम्ही पुणे बंद पाडू, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.

आम्हाला आतल्या गोटातून कळालेली माहिती खरी आहे. भीमनवार यांनी मुख्यमंत्र्यांवरील प्रेशर वाढवले आहे. मुख्यमत्र्यांनी  आता ठरवावे की, मित्राला वाचवायचं, इगो जपायचा की विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करायच्या. दुपारी कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मांडला जातो का, हे आम्ही पाहू नाहीतर ठरल्याप्रमाणे आपण पुणे बंद पाडणार, असे रोहित पवार यांनी म्हटले.

Rohit Pawar: पुणे पोलिसांनी दिल्ली पोलिसांप्रमाणे वागू नये, रोहित पवार काय म्हणाले?

पुणे पोलिसांनी पुण्यातील पुण्यात शिकवणी, अभ्यासिका चालकांसह विद्यार्थ्यांना नोटिसा पाठवल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलने बेकायदा असल्याचे नमूद करत पोलिसांकडून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कार्यपद्धतीबाबत विविध मागण्यांसाठी पुण्यात तीन ठिकाणी सुरू असलेली आंदोलने बेकायदा  आहेत. पोलिसांनी या आंदोलनांना परवानगी नाकारली असून, त्यानंतरही आंदोलन सुरू ठेवल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची शक्यता आहे. परवानगी नाकारल्यानंतर आंदोलनांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या 29 खासगी शिकवणी व अभ्यासिका चालकांसह 51 विद्यार्थ्यांना पोलिसांनी  नोटिसा बजावल्या आहेत.

यावर रोहित पवार यांनी भाष्य केले आहे. पोलिसांनी टेलिग्राम चॅनेलला नोटीस पाठवल्या आहेत. विद्यार्थांना भेटून नोटीस देण्याचा प्रयत्न केला गेला होता . माझी पुणे पोलिसांना विनंती आहे की, दिल्ली पोलिसांप्रमाणे वागू नका. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.

आणखी वाचा

राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!

Read Entire Article