Rohit Pawar On Nitesh Rane MPSC Protest Pune: विद्यार्थी पुणे बंद करतील, मुंबईत मंत्रालयावर धडकतील; 2 दिवसांचा अल्टीमेटम देतोय, रोहित पवार आक्रमक

3 weeks ago 4
ARTICLE AD

Rohit Pawar On Nitesh Rane MPSC Protest Pune: पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा (MPSC Protest Pune) आज पाचवा दिवस आहे. आंदोलनात विविध मागण्यांमुळे तीन गट पडलेत. मात्र एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन की राजकीय आखाडा? अशी स्थिती निर्माण झाली आहे. हर्षवर्धन सपकाळांपासून ते संजय राऊतांपर्यंत अनेक पक्षांच्या नेत्यांनी आंदोलकांची भेट घेतली. स्वत: शरद पवारांनीही या आंदोलनात लक्ष घातलेलं आहे. आता आज दुपारी 4 वाजता मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत. तसेच मनोज जरांगे पाटील हे देखील या आंदोलनाला भेट देणार आहेत. याचदरम्यान, एमपीएससीच्या आंदोलनात पहिल्या दिवसांपासून सहभागी असलेले शरद पवार गटाचे रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

सीजेपीचे अभिजीत दिपके यांनी आवाहन केल्याप्रमाणे पुणे शहर ठप्प होऊ शकतं. आता हे एमपीएससीचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक ठरवतील. त्यावेळी पुणेकरांनी या विध्यार्थ्यांना पाठिंबा द्यावा. 7 किंवा 8 ऑक्टोबरला राहुल गांधी येण्याची शक्यता आहे. त्यादिवशी 1 लाख विद्यार्थी पुण्यात रस्त्यावर असतील, असा आमचा अंदाज आहे. एक तर हे विद्यार्थी पुणे बंद करतील किंवा मुंबईत मंत्रालयावर धडकतील, असं रोहित पवार म्हणाले. आज राज ठाकरे, आदित्य ठाकरे आंदोलनात येणार आहेत. सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम देतोय, असा इशाराही रोहित पवारांनी एबीपी माझाशी बोलताना दिला. (Rohit Pawar On MPSC Protest Pune)

सद्यस्थितीत नितेश राणे भरकटलेले दिसतायेत- रोहित पवार (Rohit Pawar On Nitesh Rane)

रोहित पवारांनीही चर्चेची भूमिका घ्यावी. ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लढतात. त्यांनी आंदोलन करावं, पण विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये, असं आवाहन नितेश राणे यांनी केलं होतं. तसेच हा राजकारणाचा मंच नाही, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांच्या भल्यासाठीच आम्ही मंत्रालयात बसतो. रोहित पवार हे माझे मित्र आहेत. उद्या कदाचित ते माझ्याबरोबर मंत्रिमंडळात मंत्री देखील असतील. ते चांगल्याला चांगले म्हणतात. आपण विद्यार्थ्यांसाठी एकत्रित काम करू. त्यांनी आंदोलन करावं, पण विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये, असं विधानही नितेश राणेंनी केलं होतं. नितेश राणेंच्या या प्रतिक्रियेवर रोहित पवारांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. मंत्री आणि भाजपचे नितेश राणे माझे मित्र आहेत, पण मला ऑफर देण्यापेक्षा त्यांनी विध्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न मिटवावेत. आता सरकार विरोधात वातावरण पेटल्यानं ते मला मंत्री करुन सोबत काम करायचं म्हणत आहेत. याचा अर्थ त्यांना लक्षात आलंय सरकार आमचं येणार आहे. त्यामुळं त्यांनी धाडस दाखवून विरोधात बसावं, मग जेव्हा आमची सत्ता येईल, तेव्हा सोबतीनं काम करू. पण सद्यस्थितीत नितेश राणे भरकटलेले दिसतायेत, असा टोला रोहित पवारांनी लगावला.

विद्यार्थ्यांचा प्रश्न हा राजकारणाचा विषय नाही- रोहित पवार (Rohit Pawar On Nitesh Rane)

विद्यार्थ्यांचा प्रश्न हा राजकारणाचा विषय नाही, हे माझे मित्र आणि मंत्री नितेश राणे जी यांनी व्यक्त केलेल्या भावनेशी आम्ही संपूर्ण सहमत आहोत आणि सत्याग्रह आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून आम्ही हेच सांगतोय. पण दुर्दैवाने सत्ताधारी पक्षाचेच काही आमदार या विषयाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करतायेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राजकारण न करण्याबाबत आपण त्यांनाही कानपिचक्या दिल्या तर बरं होईल, असं रोहित पवारांनी सांगितले. महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नाचं मूळ ठरलेल्या MPSC चे भ्रष्ट अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा घेऊन या संस्थेतील भ्रष्टाचाराची साफसफाई करण्याची मागणी नितेश जी तुमच्या सरकारकडं करा..असं केलं तर माझ्यासह सगळे विद्यार्थी तुमचे आभार मानल्याशिवाय राहणार नाहीत. राहिला प्रश्न आपण सोबत मंत्री बनण्याचा, तर याचा अर्थ तुम्ही भाजपला ‘रामराम’ करत आहात असं आम्ही समजायचं का?, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला.

पुढील काही दिवसात पुणे बंद पाडणार, सरकारला महागात पडेल, रोहित पवारांचा इशारा, VIDEO:

संबंधित बातमी:

Omraje Nimbalkar MPSC Protest Pune: MPSC च्या आंदोलनस्थळी येताच गोंधळ, भाषणाला विरोध; मग ओमराजेंच्या एका वाक्याने टाळ्यांचा कडकडाट

Read Entire Article